शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या नावे खोटे दाखले

By admin | Updated: August 25, 2014 23:42 IST

जिल्हाधिकारी कार्यलयाने माध्यमिक शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपविली होती. राठोड यांनी २५ डिसेंबर २०१३ रोजी उपशिक्षणाधिकारी मिलिंद वसंतराव राजगुरे

अमरावती : जिल्हाधिकारी कार्यलयाने माध्यमिक शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सोपविली होती. राठोड यांनी २५ डिसेंबर २०१३ रोजी उपशिक्षणाधिकारी मिलिंद वसंतराव राजगुरे यांच्याकडे चौकशीसाठी हे प्रकरण हस्तांतरित केले. चौकशीदरम्यान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय उत्तमराव अडसोड यांच्यासह इतर अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी विकास विद्यालयातील वर्गतुकड्या टिकविण्यासाठी संगनमताने बनावट (डमी) विद्यार्थांच्या नावाचे खोटे दाखले तयार केले. या दाखल्याच्या आधारावर त्यांनी विद्यार्थांची खोटी पटसंख्या हजेरीपटावर दाखविली. हे बनावट काम करण्याकरीता त्यांनी मोर्शी तालुक्यातील डोमक येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत तत्कालिन मुख्याध्यापक एल.एस. पांडे यांची मदत घेतली. धारणी तालुक्यातील बारतांडा येथील जि.प. पूर्व माध्यमिक शाळेच्या नावाचा वापर करून विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे खोटे दाखले तयार केले. याच दाखल्यांच्या आधारावर विकास विद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेशही दाखविले. मुख्याध्यापकांसह इतर कर्मचाऱ्यांनी हजेरीपटावर खोटी (डमी) पटसंख्या दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी २४ फ्रेब्रुवारी २०१४ रोजी शिक्षणाधिकारी राठोड यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी राठोड यांनी शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश राजगुरे यांना दिले. त्यानुसार राजगुरे यांनी १३ मार्च २०१४ रोजी २६४ पानांची सर्व पुऱ्याव्यांनिशी लेखी तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. हे प्रकरण पोलीसांनी चौकशीत ठेवले. परंतु या तक्रारीचे काय झाले? याची कुठलीही माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना कळविली नाही किंवा कोणतीच कारवाई देखील केली नाही. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी मिलिंद राजगुरे यांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर ‘लोकमत’शी बोलताना संंशय व्यक्त केला.शेंडेंनी घेतली तक्रार मागेरामराव शेंडे यांनी लोकशाही दिनी विकास विद्यालयातील घोट्याळ्यांसंदर्भात तक्रार केली होती. चौकशीदरम्यान या शाळेतील घोटाळा उघडकीस आला. परंतु त्यानंतर शेंडे यांनी लोकशाहीदिनी दिलेली तक्रार मागे घेतली. त्यामुळे शेंडे यांचे समाधान झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. परंतु शासनाची दिशाभूूल थांबविण्यासाठी शिक्षणाधिकारी राठोड यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश उपशिक्षणाधिकारी राजगुरे यांना दिले. वसतिगृहातही बोगस प्रवेशविकास विद्यालय या शाळेअंतर्गत समाजकल्याण विभागाद्वारे संचालित महात्मा फुले वसतिगृह आहे. या वसतिगृहातही विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेश दाखविण्यात आले आहेत.