शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्य घसरणार

By admin | Updated: September 29, 2014 00:31 IST

आघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी

उमेदवारांची भाऊगर्दी : प्रचारासाठी अत्यंत कमी अवधीगणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत झालेली ताटातूट आणि बसप, मनसेचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे. शनिवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेली गर्दी पाहता या शक्यतेला बळ मिळत आहे. जिल्ह्यात आठही मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, बसपचे उमेदवार रिंगणात कायम राहावेत, अशी पक्षस्तरावर नेत्यांनी तयारी चालविली आहे. १ आॅक्टोबरपासून निवडणूक प्रचारात खरी रंगत येईल. मात्र, पक्षाने दिलेल्या उमेदवाराची प्रतिमा बघूनच मतदार पुढील निर्णय घेतील, असे दिसून येते. काही मतदारसंघांमध्ये दुहेरी तर काही मतदारसंघात तिहेरी लढतीचे संकेत आहेत. जिल्ह्यात अनेक दिग्गजांनी निष्ठा आणि वैचारिकतेला तिलांजली देऊन आमदारकीसाठी पक्षांतर केले. दोन दिवसांपूर्वी जे नेते राष्ट्रवादीत होते आता ते शिवसेना, भाजपात गेले आहेत. ज्यांना राष्ट्रवादीची ‘अ‍ॅलर्जी’ होती, आता ते राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाताला बांधून प्रचार करीत आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने क्षणातच पक्षांतर करण्याचा अनुभव मतदारांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आला. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता प्रमुख पक्षांमध्येच काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. यावेळी काहींना दुसऱ्यांदा तर काहींना तिसऱ्यांदा आमदार होण्याचे वेध लागले आहेत. परंतु उमेदवारांची गर्दी बघता मतांचे विभाजन अटळ आहे. परिणामी सर्वच उमेदवारांचे मताधिक्य घसरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी, भाजप- सेनेची युती संपुष्टात आल्यामुळे या पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तसेच मनसे, बसप, रिपाइं, अपक्षांचीही गर्दी आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन पाठिंब्याचा आणि पुढील ‘व्यवहारा’चा मार्ग खुला ठेवला आहे. आघाडी, युती संपुष्टात आल्याने वेळेवर उमेदवार शोधण्यासाठी सर्वच पक्षांची तारांबळ उडाली. बहुतांश पक्षांना बाहेरुन उमेदवार आयात करावे लागले त्यामुळे एकूण चित्र पालटले आहे.