विकास कामे घराघरांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: August 21, 2014 23:32 IST2014-08-21T23:32:36+5:302014-08-21T23:32:36+5:30

अग्रेसर महाराष्ट्राला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी युवकांनी तिवसा मतदारसंघात केलेल्या १२६० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन

Extend development works to households | विकास कामे घराघरांपर्यंत पोहोचवा

विकास कामे घराघरांपर्यंत पोहोचवा

आ. यशोमती ठाकूर यांचे आवाहन : तिवस्यात युवक कॉंग्रेसचा मेळावा
तिवसा : अग्रेसर महाराष्ट्राला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी युवकांनी तिवसा मतदारसंघात केलेल्या १२६० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी युवकांना केले.
तिवसा येथे आयोजित तिवसा विधानसभा युवक काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी आ. यशोमतींनी युवकांशी संवाद साधला. या मेळाव्याला माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, प्र्रकाश मक्रमपुरे, माजी जि.प. सभापती दिलीपराव काळबांडे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, ठाकूरदास मालाणी, पं.स. सभापती देवीदास डेहनकर, उपसभापती भारत ढोणे, सदस्या कविता पचलोरे, अभिजित बोके, रितेश पांडव, वैभव वानखडे, शहजाद पटेल, संदीप रिठे, हरीभाऊ मोहोड, सरिता मकेश्वर, जयंत देशमुख, प्रशांत डहाणे, विनोद डांगे, वीरेश साबळे यांच्यासह चारही तालुक्यांतील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. यशोमतींनी विरोधकांवर तोफ डागली. त्या म्हणाल्या, जे आई-वडिलांचीच सेवा करू शकत नाही, ते मतदारसंघाची काय सेवा करणार, असा प्रश्न उपस्थित करुन काँग्र्रेस ही एक विचारधारा आहे. त्याला कुणी संपवू शकत नाही, अशा शब्दात विरोधकांवर तोफ डागली. व्यासपीठावर उपस्थित युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही सुसंस्कृत तिवसा विधानसभा म्हणविणाऱ्यांवर भाषणातून हल्लाबोल केला.
तिवसा विधानसभा मतदारसंघातल्या चारही तालुक्यातून युवकांनी या मेळाव्याला भरगच्च उपस्थिती दर्शवून आ. यशोमती पुन्हा एकदा विजयाची हाक दिली. संचालन ज्योती तोटेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आ. यशोमती ठाकूर यांच्या १२६० कोटी रुपयांच्या विकासकामांवर प्रकाशित झालेल्या ‘यशोगाधा’ या पुस्तकाचेही यावेळी विमोचन करण्यात आले.
तत्पूर्वी युवक काँग्रेसच्या मेळाव्यापूर्वी स्वयंस्फूर्तीने तिवस्यात उपस्थित युवकांनी शहरातून भव्य रॅली काढून तिवसा शहराचे लक्ष वेधले. या दुचाकी रॅलीत आ. यशोमती ठाकूरसुध्दा सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Extend development works to households