शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांचे जाचक निकष

By admin | Updated: March 13, 2015 00:23 IST

महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्याकरिता नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामान केंद्र उभारणी करणेबाबत विमा कंपनी कारवाई करेल,...

अमरावती : महसूल मंडळस्तरावर हवामान घटकाच्या नोंदी घेण्याकरिता नोंदणीकृत त्रयस्त संस्थेमार्फत स्वयंचलीत संदर्भ हवामान केंद्र उभारणी करणेबाबत विमा कंपनी कारवाई करेल, असे सांगण्यात आले.अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन पिकाकरिता १९,००० विमा संरक्षित रक्कम ७.७० टक्केवारी व १४६३ रूपये प्रतिहेक्टर वास्तवदर्शी विमा हप्ता हे सूत्र कृषी विभागाने सांगितले. कापसाकरिता २२ हजार रूपये विमा संरक्षित रक्कम ११.२७ टक्केवारी व २४६४ रूपये प्रतिहेक्टर वास्तवदर्शी हप्ता असे सूत्र होते. यामधील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांची, २५ टक्के राज्य सरकार व २५ टक्के केंद्र शासनाने भरणा केला. विमा संरक्षित कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत या विमा कंपनीकडून भरपाई मिळणार होती. प्रत्यक्षात विम्याच्या हिस्स्याईतपतही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमा कंपनीच्या जाचक निकषामुळे अवेळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्या प्रमाणात मदत मिळू शकली नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्याचे हित जपले, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.उडदाला विमाहप्त्याएवढी भरपाई नाहीजिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांनी ११.६६ हेक्टर क्षेत्राकरिता १७ हजार ९३० रूपये हप्ता भरून १ लाख ६३ हजार २४० रूपयांचे पीक विमा संरक्षण केले. प्रत्यक्षात नुकसान भरपाई मात्र १३,२१६ रूपये मिळाली. यामुळे ही शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा केल्याची चर्चा सुरू आहे.