शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

उत्कंठा सर्वांनाच, अचलपुरात दिग्गज इच्छुक

By admin | Updated: June 14, 2014 23:01 IST

हिंदू, मुस्लिमांच्या कडव्या समर्थकांची किनार असलेल्या अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस आणि भाजप या तीनही पक्षांचे उमेदवार राजकीय भवितव्य सुस्थापित करण्याच्या जोरकस प्रयत्नात आहेत.

सेनेची स्थिती वाईट : बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे चर्चेत
गणेश देशमुख - अमरावती
हिंदू, मुस्लिमांच्या कडव्या समर्थकांची किनार असलेल्या अचलपूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस आणि भाजप या तीनही पक्षांचे उमेदवार राजकीय भवितव्य सुस्थापित करण्याच्या जोरकस प्रयत्नात आहेत. दोन टर्मपासून कुठल्याही राष्ट्रीय राजकीय पक्षाला पाय रोवता न येणाऱ्या या मतदारसंघात यावेळी काय घडते, याची मोठी उत्सुकता जिल्ह््याला आहे.
प्रहारचे बच्चू कडू अचलपूरचे आमदार आहेत. एकेकाळच्या या 'अँग्री' तरुणाने कुठल्याही राजकीय वारस्याशिवाय स्वत:ची छाप मतदारांच्या 'दिलां'वर उमटविली होती. रुग्ण, अपंग, शेतकरी यांच्यासाठी अव्याहतपणे कार्य करणाऱ्या या नेत्याच्या त्यावेळच्या आणि आताच्या व्यक्तिमत्त्वात तफावत जाणवत असल्याची चर्चा मतदारसंघातील नागरिक करतात.
अचलपूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख प्रबळ दावेदार आहेत. वसुधा देशमुखांचा अनुभव मोठा आहे. ज्येष्ठ लोकांनी उमेदवारी मागण्याऐवजी धावपळ होऊ शकेल अशा लोकांना उमेदवारी द्या, असा आग्रह धरणारा एक गट काँग्रेसमध्ये जोमाने सक्रिय आहे. बबलू देशमुख यांना जिल्हा परिषदेच्या, बँकेच्या अध्यक्षपदाचा अनुभव आहे. प्रशासनावर त्यांची पकड आहे. काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आहेत. पक्षात मुख्यमंत्र्यांपर्यंत 'अ‍ॅप्रोच' आहे. बबलू देशमुख त्यामुळे काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा मानले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्या सुरेखा ठाकरे यांनीही हा मतदारसंघ नियोजनबद्धरीत्या बांधला आहे. शरद पवारांच्या खास गोटातील सुरेखा ठाकरे हल्ली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. कामाचा धडाका मोठा आहे. वाणी गोड आहे. त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळावी, असे मानणारा मोठा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे; तथापि अचलपूरची जागा नेहमी काँगे्रसच्याच वाट्याला आली आहे. यापूर्वी दोनवेळा काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. काँग्रेसच्या अपयशाचा हवाला देऊन यावेळी अचलपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावी, असा पराकोटीचा आग्रह राष्ट्रवादीकडून सुरू आहे.