शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हिसबुक’मध्ये ‘त्रुटींचा’ बाजार

By admin | Updated: September 13, 2016 00:16 IST

सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये सावळा गोंधळ घातला आहे.

‘जीएडी’च्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह : अद्ययावतीकरण केव्हा ? प्रदीप भाकरे अमरावतीसामान्य प्रशासन विभागाने अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये सावळा गोंधळ घातला आहे. बहुतांश कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सर्विसबुकमध्ये त्रुटी आढळून आल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. महापालिका आस्थापनेवर रुजू झालेल्या प्रत्येकाची वैयक्तिक सेवा पुस्तिका बनविली जाते. रजा, पदोन्नती, चारित्र्य पडताळणी, वार्षिक वेतनवाढ, वेतनश्रेणी, निबंधन, जातपडताळणी अशा साऱ्याच बाबींची यात नोंद घेतली जाते. मात्र, महापालिकेतील ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांचे अद्ययावतीकरणच करण्यात आले नाही. सेवापुस्तिका अर्थात सर्विसबुकमध्ये मागील पाच ते सात वर्षांपासूनच्या नोंदी न घेतल्याने काही अधिकारी-कर्मचारी वैतागले आहेत. काहींनी त्यातूनही स्वत:चे हित साधून घेतले आहे. सर्विसबुक अपडेट ठेवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभाग ‘जीएडी’ची आहे. तथापि अनेक कर्मचाऱ्यांच्या मूळ नस्ती या विभागाकडे उपलब्ध नाहीत. तर अनेकांच्या निलंबनाची, वेतनवाढ थांबविण्याची नोंद घेतलेली नाही. एकंदरीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्विसबुक त्रुटींचे माहेरघर बनले आहे. सेवा पुस्तिकांची पुनर्तपासणी झाल्यास आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचे घबाड बाहेर पडण्याची शक्यता आहे. श्रीराम आगाशे, सुषमा मकेश्वर, सचिन पेपटकर, मदन तांबेकर, डी.पी. मेश्राम, सुनील पकडे, मनोज शहाणे, राजेश आगरकर, शैलेश बोरकर, दिनेश हंबर्डे, ए.ए. अवसरे, पी. जे. देशमुख, प्रमोद कुलकर्णी, पी. जे. देशमुख बी.के. तिरपुडे, एन.व्ही. आघाडे, आर. आर .तांबेकर, मंगेश कडू, शरद तिनखेडे, विवेक देशमुख, प्रमोद इंगोले, नितीन भाटकर आदी आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या ‘सर्विसबुक’मध्ये डझनावर त्रुटी नोंदविल्या गेल्या आहेत.या आहेत त्रुटीवेतन निश्चितीच्या नोंदीवर उपायुक्तांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. चारित्र्य पडताळणी व स्वास्थ्य प्रमाणपत्राची नोंद नाही. वेतन वाढीच्या नोंदी घेतलेल्या नाहीत. वेतन निश्चितीच्या नोंदींमध्ये तफावत अधिकृत/अनधिकृत रजेच्या नोंदी नाहीत विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद नाही. जात पडताळणीची नोंद घेतलेली नाही. राजपत्रात नाव बदलल्याची नोंद नाही. अर्जित रजेचे लेखे अद्ययावत नाहीत.