शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी दोषी, अधिकारी निर्दोष कसे?

By admin | Updated: June 18, 2014 23:50 IST

घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही.

दुजाभाव : ३६ शिपायांवर कारवाई, वरिष्ठांना सारेच माफ
गणेश देशमुख - अमरावती
घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. आंधळ्यांनाही दिसावा असा कसूर अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात असतानाही पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी का घालतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरावती शहरातील सामान्य नागरिक कमालीचा भयभीत आहे. एप्रिल महिन्यात २७, मे महिन्यात २५, जून महिन्यात १६ चोऱ्या-घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत चोरीचे ३३६ अािण घरफोडीचे ११९ गुन्हे घडले आहेत. अनेक वस्त्यांमध्ये चोर दिसतात. सतर्क नागरिकांमुळे त्यांना पोबारा ठोकावा लागतो. चोर कधीही येईल, या धास्तीमुळे सामान्य नागरिक कायम दहशतीत आहे. घराला मजबूत कडीकोंडे लावणे, लोखंडी दरवाजे लावणे, ग्रील, चॅनेलगेट लावणे असले उपाय करून सामान्यजनांनी स्वत: शक्य ती उपाययोजनी करवून घेतली. बाहेरगावी जाण्याचा बेत अनेकांनी रद्द केला; तथापि चोऱ्या थांबतच नाहीत म्हटल्यावर रात्री नागरिकांचा डोळा लागणार तरी कसा?
एक-दोन नव्हे, चोऱ्यांचे सत्र लागोपाठ सुरू आहे. दोन हजार पोलिसांच्या फौजेचा प्रमुख असलेल्या पोलीस आयुक्तांना, अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मान खाली घालावी लागत आहे. तरीही सुरेशकुमार मेकला यांनी एकाही अधिकाऱ्यावर कठोर कारवाई का करू नये, हा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या १९ आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या १७ कर्मचाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला. कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी हजार आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड या कारवाईअंतर्गत वसूल करण्यात आला. हे कर्मचारी अकार्यक्षम असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. आमचा सवाल त्याही पुढचा आहे. प्रत्येक ठाण्याचा प्रमुख हा ठाणेदार असतो. ठाणेदार योग्यरीत्या कर्तव्य बजावतात की नाही याचे निरीक्षण करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त अर्थात एसीपींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एसीपी आणि पोलीस ठाणी योग्यरीत्या कर्तव्य बजावतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शहरात १० ठाणी आहेत. एसीपींची पाच कार्यालये आहेत. त्यापैकी चार कार्यरत आहेत. तीन डीसीपी आहेत.