शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आपात्कालीन शोध बचाव पथक अ‍ॅलर्ट

By admin | Updated: July 29, 2014 23:33 IST

मागील आठवड्यात झालेला अतिवृष्टीचा पाऊस आणि २७ जुलै रोजी महापुराच्या तडाख्याने संकटात सापडलेल्या नागरिकांच्या शोध बचाव पथकात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे जवान अद्यापही

नैसर्गिक आपत्ती कक्ष : प्रशासकीय यंत्रणेद्वारा पूरबाधित क्षेत्राचा मागोवा अमरावती : मागील आठवड्यात झालेला अतिवृष्टीचा पाऊस आणि २७ जुलै रोजी महापुराच्या तडाख्याने संकटात सापडलेल्या नागरिकांच्या शोध बचाव पथकात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे जवान अद्यापही जिल्हा मुख्यालयात असलेल्या नैसर्गिक आपतकालीन कक्ष येथे सुटीच्या दिवशीही तळ ठोकून असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरफटका मारला असता दिसून आले. अतिवृष्टीमुळे पुराचा तडाख्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वित्त व प्राणहाणीच्या घटना घडल्या. नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे या संकटात सापडलेल्या नागरिकांच्या बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपतकालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २७ जुलै रोजी पूर्णा प्रकल्पाचे पाणी कुठलीही पूर्वसूचना न देता नऊही दारे उघडल्यामुळे नदी काठावर असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी, विश्रोळी, काजळी, देऊरवाडा, थुगाव पिंप्री, कुरळपूर्णा, धानोरा, राजना, तुळजापूर गढी, आसेगाव पूर्णा आदी गावांमध्ये हाहाकार उडाला. दरवेळी धरणाची दारे उघडताना त्याची पूर्वसूचना संबंधित गावांना देण्यात येते. मात्र यावेळी काही गावांना याची कुठलीही माहिती नव्हती.