शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विजेची देयके उशिरा हाती महावितरणची लूट माथी

By admin | Updated: November 3, 2014 23:17 IST

जिल्ह्यात चार लाख ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि. (महावितरण) च्यावतीने किमान ६० टक्के ग्राहकांच्या हाती उशिरा देयके दिली जात आहेत.

लाखोंचा डल्ला : जिल्ह्यात चार लाख वीज ग्राहकांची नोंदगणेश वासनिक -अमरावतीजिल्ह्यात चार लाख ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि. (महावितरण) च्यावतीने किमान ६० टक्के ग्राहकांच्या हाती उशिरा देयके दिली जात आहेत. त्यामुळे अंतिम तारखेनंतर देयके भरण्याचा प्रसंग ग्राहकांवर ओढावत असल्याने विलंब आकाराच्या भुर्दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. वीज ग्राहकांची लूट करण्यासाठी जणू महावितरणने देयके वाटप करणाऱ्या कंत्राटदारांसोबत हातमिळवणी केल्याचा सूर उमटू लागला आहे.स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार, एलबीटी, वीज विक्री आकार, व्याज असे वेगवेगळ्या आकारात समायोजन करुन ग्राहकांच्या हाती वीज देयके दिली जातात. अव्वाच्या सव्वा देयके आकारली जात असताना ही देयके ग्राहकांच्या हाती विलंबाने पडत असल्याने देयके वेळेपूर्वी अदा करणे कठीण होते. त्यामुळे विलंबाने देयके भरण्याचा प्रसंग अनेक ग्राहकांवर ओढवत आहे. एकट्या महानगरात १ लाख ४० हजार वीजग्राहक आहेत. यापैक ी ६० टक्के वीज ग्राहक विलंबाने देयके भरत असतील तर महावितण कंपनीकडे महिन्याकाठी प्रत्येक ग्राहकांकडून एका देयकामागे २० ते ८० रुपयांपर्यत विलंब आकाराची रक्कम जमा होते. ही रक्कम महिन्याला लाखोंच्या घरात जाते, हे वास्तव आहे. हीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे. ग्रामीण भागात २ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत. दोन ते तीन दिवसांच्या फरकावर वीज देयके ग्राहकांना हाती मिळत असेल तर ग्रामीण भागातील गोरगरीब देयके भरण्यासाठी कशी व्यवस्था करणार? हा खरा सवाल यानिमित्त्याने पुढे आला आहे. वीज ही प्रत्येकाची गरज झाल्यामुळे शहर असो की ग्रामीण भागातील ग्राहक विलंब आकाराने वीज देयके अदा करुन महावितरणच्या घशात दर महिन्याला अतिरिक्त स्वरुपात लाखोंची रक्कम ओतत आहे. वर्षाकाठी हा आकडा कोट्यवधींच्या घरात जात असून, प्रत्येक वीज ग्राहक दर महिन्याला उशिरा देयके हाती येत असताना ती निमूटपणे स्वीकारुन विलंबाने देयके अदा करीत असल्याचे दिसून येते. मात्र याप्रकरणी महावितरण ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ असे सोंग घेत वर्षाकाठी ग्राहकांच्या खिशाला कोट्यवधी रुपयांची कात्री लावत आहेत. विलंबाने देयके वाटप करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु असताना महावितणच्या अधिकाऱ्यांकडून बघतो, पाहून घेतो, अभियंत्याला सांगतो, अशी उडवा- उडवीची उत्तरे सामान्यांना दिली जात आहेत. विलंबाने वीज देयके देण्याचा प्रकार टाळावा व ग्राहकांची होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.