शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात वीज कंपनीची पोलखोल

By admin | Updated: June 19, 2014 23:34 IST

मंगळवारी अमरावतीत मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने विद्युत विभागाची पोलखोल केली. सौम्य वाऱ्यासह आलेल्या पावसानेसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अर्ध्या अमरावतीकरांना रात्र अंधारात

अर्ध्या अमरावतीत काळोख : वीज कंपनी करते तरी काय?अमरावती : मंगळवारी अमरावतीत मान्सूनचे आगमन झाले. पहिल्याच पावसाने विद्युत विभागाची पोलखोल केली. सौम्य वाऱ्यासह आलेल्या पावसानेसुध्दा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अर्ध्या अमरावतीकरांना रात्र अंधारात काढावी लागली. नागरिकांकडून विजेची भरमसाठ देयके वसूल करण्यात वीज कंपनी नेहमीच अग्रेसर असते. एक महिन्याच्या थकीत देयकाकरिता ग्राहकांचा वीजपुुरवठा खंडित केला जातो. मात्र ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याकडे मात्र वीज कंपनी दुर्लक्ष करीत आहे. उपचार सुरू असताना त्यांना लावण्यात आलेले सलाईन संपल्यानंतरही कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व परिचारिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. श्रीराम दयालकर यांचा मुलगा श्रीकांत हा सैन्यात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.वीज प्रवाह सुरळीत करण्याकरिता विज कंपनीकडे मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा फौज फाटा आहे. तसेच हजारो कर्मचारीही कार्यरत आहेत. मात्र तरीही वीजपुरवठा करण्यात वीज कंपनी असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता अनेक ग्राहक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करीतच राहतात. मात्र तरीही ग्राहंकांचे योग्य समाधान वीज कंपनी कर्मचारी करीत नाही, अशी ओरड नेहमीच होत आहे. केन्द्र शासनाच्या विद्युत अधिनियम २००३ नुसार जिल्हास्तरीय विद्युतीकरणाचा कार्यक्रम राबविण्यासाठी अमरावती जिल्हा विद्युतीकरण समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासनाकडूुन वीज कंपनीला आतापर्यंत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून विद्युतीकरणाचे कार्य युध्द स्तरावर सुरू आहे. मात्र कामात हलगर्जीपणाचे भाव विज कंपनी कर्मचारी दाखवित आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असतानाही विद्युत वितरण कंपनीचा कामकाज संथगतीने होत आहे. मागील काही दिवसांपासून मेळघाटातील काही भागात विद्युत पुरवठा खंडीत आहे.तसेच जिल्हातील काही गावामध्ये अंधार असल्याचे लोकप्रतिनिधीनी जिल्हा विद्यतीकरण समन्वय बैठकती सांगितले मात्र अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश मिळाले नाही. मंगळवारी सायंकाळनंतर अमरावतीत पावसाच्या सरी बरसल्या. पाऊस सुरु होताच अर्ध्या अमरावतीत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सर्वत्र काळोख पसरला होता.