शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचा विकास निधीला फटका

By admin | Updated: May 10, 2014 01:15 IST

राज्यातील सर्व आमदारांना आपआपल्या मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात २ कोटी इतका विकास निधी दिला जातो;

चांदूरबाजार : राज्यातील सर्व आमदारांना आपआपल्या मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात २ कोटी इतका विकास निधी दिला जातो; मात्र सन २0१४-१५ या आगामी आर्थिक वर्षात विधानसभेची निवडणूक अपेक्षित असल्याने या वर्षात केवळ विकासाकरिता सात महिन्यांचा अवधी मिळणार असल्याने स्थानिक विकास निधीत कपात करण्यात आली आहे. २ कोटीऐवजी १ कोटी १६ लाख ६६ हजार एवढय़ाच निधीवर आमदारांना आपल्या मतदारसंघाचा विकास करावा लागणार आहे. याबाबतचे निर्देश नियोजन विभाग मंत्रालयाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयातील नियोजन उपायुक्तांना दिले आहेत.
स्थानिक विकास वार्षिक कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील २८९ विधानसभा आमदार व ७८ विधान परिषद आमदार असे एकूण ३६0 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात स्थानिक विकास कामे करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये प्रत्येक वर्षाला देण्यात येतात. मात्र, सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ आक्टोबर २0१४ चे अखेर संपण्याची शक्यता लक्षात घेता नोव्हेंबर-डिसेंबर २0१४ मध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
ही बाब लक्षात घेता विद्यमान विधानसभेचा सन २0१४-१५ या आर्थिक वर्षातील कार्यकाळ एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्यांचा राहील. त्यामुळे विधानसभा सदस्यांना पहिल्या सात महिन्यांसाठी १ कोटी १६ लाख ६६ हजार इतका निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांच्या १ कोटी १६ लाख ६६ हजार इतक्या निधीच्या विकास कामांनाच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असून ही प्रशासकीय मान्यता देत असताना मागील वर्षातील स्लीपची रक्कम विचारात घेऊनच कामांना मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश नियोजन विभाग मंत्रालयाने दिल्याची माहिती आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ एप्रिलच्या पत्रान्वये लोकसभा निवडणुकीची राज्यातील आचारसंहिता अंशता शिथिल केल्यामुळे सन २0१४-१५ या वर्षातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्या अनुषंगाने आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत निधीचे वितरण लवकरच वित्त विभागाच्या मान्यतेने करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)