शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांना सुचले उशिराचे शहाणपण !

By admin | Updated: June 27, 2016 00:04 IST

शहर तथा जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आणि प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर ‘टिसी रिलिज करा’ अशा सूचना मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सूचना : टीसी रिलीज कराअमरावती : शहर तथा जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आणि प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर ‘टिसी रिलिज करा’ अशा सूचना मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी गुल्हाने यांच्या या पवित्र्यावर शहरातील अनेक मुख्याध्यापकांनी उशिराने सुचलेले शहाणपण, अशी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.विजय गुल्हाने यांनी मनपाच्या शाळा मुख्याध्यापकांचे टिसी देण्याचे अधिकार गोठविले होते. आपल्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही पाल्य व पालकाला टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) देण्यात येऊ नये, असे फर्मान त्यांनी सोडले होते. त्यावर मुख्याध्यापक संघाचे एन. टी. अर्डक व अन्य शिक्षक, मुख्याध्यापकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. तथा गुल्हाने यांनी सोडलेले फर्मान आरटीई कायद्यातील तरतुदीचा भंग असल्याचे म्हटले होते. आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही विद्यार्थ्याची टिसी रोखता येत नाही. तथापि मनपा शाळेची पटसंख्या स्थिर ठेवण्यासाठी टिसी न देण्याच्या सूचना आपण मुख्याध्यापकांना केल्या आहेत, असे लंगडे समर्थन गुल्हाने यांनी केले होते. महापौर रिना नंदा यांनीसुद्धा शिक्षणाधिकारी गुल्हाने यांना कुणाचीही टिसी न रोखण्याचे निर्देश दिले होते. गुल्हानेंनी महापौरांचे आदेशही मानले नाहीत. आता त्यात शाळा सुरू झाल्यानंतर टिसी देण्याच्या सूचनेची भर पडली आहे. (प्रतिनिधी)काय म्हणतात गुल्हाने?टीसी देण्याचे स्थगित केलेले अधिकार पुन्हा प्रदान करण्यात येत आहेत. पालकांच्या विनंतीवरून तत्काळ टीसी द्यावी, ईओच्या परवानगीची गरज नाही, अशा सूचना गुल्हाने यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. ऐनवेळी प्रवेश कुठे घ्यायचे ?शहरातील शाळा २७ जूनपासून सुरू होत आहेत. बहुतेक शाळांमधील प्रवेश प्रक्रियाही आटोपली आहे. त्यामुळे गुल्हानेंच्या सूचनेनुसार आता विद्यार्थ्यांना टीसी मिळाल्यात, तरीही त्यांचा प्रवेश अन्य शाळेत होणे नाही. गुल्हानेंच्या हटयोगामुळे अनेक पाल्यांचे शैक्षणिक भविष्यही धोक्यात आले आहे.