शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत धावणार ई-रिक्षा

By admin | Updated: September 8, 2016 00:17 IST

मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील.

शासनाचा निर्णय : नियमावली जाहीरअमरावती : मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील. यात अमरावतीचाही समावेश आहे. याशिवाय विभागातील बुलडाणा, अकोला या दोन शहरांमध्ये ई-रिक्षांना प्रायोगिक तत्वावर परवानगी दिल्यानंतर आता राज्य शासनाने उर्वरित जिल्ह्यातही ई-रिक्षांना परवानगी दिली आहे. केंद्रशासनाने ई-रिक्षाबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार दिल्लीत ई-रिक्षाचा प्रयोग राबविण्यात आला. तो यशस्वीही झाला. त्यामुळे या रिक्षांना अन्य राज्यातही परवानगी देण्यात आली. दिल्ली प्रमाणेच ई-रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गृहविभागाने ई-रिक्षांच्या परवान्यासाठी निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार ई-रिक्षाचालकाला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना स्थानिक परिसराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व सार्वजनिक वाहतूक करण्याचा परवाना (बॅच) असावा. परवानाधारकाकडे पंधरा वर्षांच्या वास्तव्याचा दाखला असावा. रिक्षाचालकाला त्याचे नाव आणि नंबरसहित छोटा फलक लावावा लागणार आहे. ई-रिक्षांना आॅटोरिक्षाप्रमाणे शहराच्या कोणत्याही भागात प्रवास करता येणार नाही. दिलेल्या मार्गावरच प्रवासी वाहतूक करण्याचे बंधन त्याच्यावर राहणार आहे.परवाने कोणाला मिळणार ?केवळ सायकलरिक्षा चालविणाऱ्या चालक व मालकांना ई-रिक्षाचे परवाने देण्यात यावेत, तशी तरतूद नियमावलीत केली आहे. बहुतांश जिल्ह्यातून सायकलरिक्षा हद्दपार झाल्या आहेत. अमरावतीतही फार वर्षापूर्वीच सायकल रिक्षा बंद झाल्यात. त्यामुळे ई-रिक्षाचे परवाने कोणाला दिले जाणार, अमरावतीत या रिक्षा धावू शकणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.महत्त्वाचे मुद्देई-रिक्षामध्ये चार प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.या रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे असेल.रिक्षातून ४० किलोपर्यंतच्या वजनाच्या वस्तुंची वाहतूक करता येईल.आरटीओकडून दरनिश्चिती केली जाणार आहे.