शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

दारूच्या नशेत सासू, मेव्हण्याला पेट्रोल टाकून जाळले; मारेकऱ्याने केली आत्महत्या

By प्रदीप भाकरे | Updated: September 25, 2023 15:22 IST

वंडली येथील घटना : मृत मारेकऱ्याविरूद्ध खुनाचा गुन्हा, तिघांचेही मृतदेह झाले कोळसा

वरूड (अमरावती) : मद्यधुंद अवस्थेत सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर मारेकरी जावयाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडविणारी ही रक्तरंजित घटना तालुक्यातील वंडली येथे सोमवारी पहाटे १.१५ च्या सुमारास उघड झाली. पोलिसांनी वंडली येथील झोपडीवजा घरातून तिघांचेही कोळसा झालेले मृतदेह ताब्यात घेतले. सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते अक्षरश: जाळून टाकले.

वंडली येथील लताबाई सुरेशराव भोंडे (४७), त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (२२) व मारेकरी आशिष ठाकरे (२५, रा. वरूड) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी, बेनोडा पोलिसांनी मृतक आशिष ठाकरेविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

वंडली येथे सोमवारी पहाटे १.१५ दरम्यान लताबाई भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याची माहिती तेथील पोलीस पाटील यांनी बेनोडा पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार स्वप्नील ठाकरे हे अग्निशमन दलासह घटनास्थळावर दाखल झाले. पोलीस व अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून लागलेली आग विझविण्यात आली. त्यानंतर त्या घरात तीन व्यक्तींचे मृतदेह पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह एसडीपीओ निलेश पांडे व एलसीबीचे निरिक्षक किरण वानखडे यांनी घटनास्थळ गाठले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती