शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी अनुदानाचा ४० हजार २४४ शेतकऱ्यांना होणार लाभ

By admin | Updated: January 18, 2015 22:29 IST

वरुड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके बाधित झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मृग बहराचीही फूट झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. शासनाने

वरूड : वरुड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके बाधित झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मृग बहराचीही फूट झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. शासनाने सन २०१४ च्या खरीप हंगामातील बाधित पिकांच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात देण्यात येणार आहे. यामध्ये ४० हजार २४४ लाभार्थी शेतकरी संख्या असून पहिल्या टप्पयातील १२ कोटी ७७ लाख ८ हजार रुपयांची रक्कम वाटप होणार आहे.खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे विभागातील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले होते. नुकसान झालेल्या शेताचा शासनाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. जिरायती पिकासाठी ४ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती क्षेत्रासाठी ९ हजार रुपये तर संत्रा आणि फळपिकासाठी १२ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर करण्यात आली होती. ही रक्कम अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांसाठी १२५ कोटी ७९ लाख रुपये प्राप्त झाले. यामध्ये अमरावती तालुक्यासाठी ८ कोटी ९७ लाख ५४ हजार रुपये, भातकुली तालुका ७ कोटी ९९ लाख १९ हजार रुपये, तिवसा तालुका ६ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये, चांदूररेरल्वे तालुका ६ कोटी ३३ लाख ८ हजार रुपये, धामणगाव रेल्वे तालुका ७ कोटी ७७ लाख ७१ हजार रुपये, नांदगाव खंडेश्वर तालुका १० कोटी ५२ लाख ५० हजार रुपये, दर्यापूर तालुका ११ कोटी ३९ लाख ६२ हजार रुपये, अंजनगाव तालुका ६ कोटी ५१ लाख १६ हजार रुपये, अचलपूर तालुका १२ कोटी १० लाख ३२ हजार रुपये, चांदूरबाजार तालुका १२ कोटी ५ लाख ४८ हजार रुपये, मोर्शी तालुका ११ कोटी ९६ लाख ६१ हजार रुपये, धारणी तालुका ६ कोटी ६६ लाख ४२ हजार रुपये, चिखलदरा तालुका ४ कोटी १४ लाख ७४ हजार रुपये मदत वाटप होणार आहे. यामध्ये खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत वरुड तालुक्यात ४० हजार २४४ लाभार्थी शेतकऱ्यांना १२ कोटी ७७ लाख ८ हजार रुपये मिळणार असल्याचे तहसीलदार राम लंके यांनी सांगितले. ही मदत २६ जानेवारीपर्यंत वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तहसीलदार यांनी २९ कोटी २३ लाख ९० हजार ४२० रुपयाची मागणी केली असून दुसरा प्राप्त होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)