शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग स्कूलसाठी आता स्वतंत्र ‘ट्रॅक’

By admin | Updated: February 16, 2015 00:22 IST

माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रस्ते वाहतुकीच्या नियमावलीत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

लोकमत विशेषगणेश वासनिक अमरावतीमाजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रस्ते वाहतुकीच्या नियमावलीत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांवरील होणारे अपघात टाळण्यासाठी नवीन वाहतूक नियमावलीचा मसुदा तयार केला जात आहे. राजपत्रानुसार आता वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देताना ड्रायव्हिंग स्कुलला स्वतंत्र ‘ट्रॅक’ निर्माण करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलला रस्त्यावर प्रशिक्षण देता येणार नाही, हे विशेष.केंद्र शासनाच्या राजपत्रात नमूद असलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी केंद्रीय भूतल मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. परंपरागत पद्धतीने सुरु असलेले वाहन चालविण्याचे परवाने आणि प्रशिक्षणात बराच बदल करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये पहिल्या टप्प्यात वाहन चालविण्याचा परवाना आॅनलाईन करण्यात आला आहे. तसेच वाहन चालविण्याचे परवाने मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे आरटीओत सुरु असलेल्या दलालांच्या हैदोसावर अंकुश लावणे सुकर झाले आहे. दरवर्षी रस्ते अपघातात निरपराधांचे मृत्यू होण्याची संख्या ही लाजिरवाणी बाब असल्याची खंत काही महिन्यांपूर्वी ना. गडकरी यांनी जाहिररीत्या व्यक्त केली होती. वाहतूक नियमावलीत असलेल्या पळवाटा, विना परवाना वाहन चालविण्याचा प्रकार, चालकांना वाहतूक नियमांचे अज्ञान अशा एक ना अनेक प्रश्नांवर गडकरींनी बोट ठेवले होते. वाहन चालविण्याचे  प्रशिक्षण महागणारआरटीओंनी प्रमाणित केलेल्या ड्रायव्हिंग स्कूलमधून हल्ली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. या स्कूलच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीनुसार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चारचाकी वाहनांचा प्रशिक्षणासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे. मात्र नवीन नियमावलीनुसार ‘ट्रॅक ’मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरु झाले की, १० ते १५ हजार रुपये शुल्क आकारले जाईल, असे संकेत आहेत.आॅनलाईन परवाने  नोंदणीची केवळ प्रतीक्षाचप्रादेशिक परिवहन विभागात पारदर्शकता आणण्यासाठी वाहन चालविण्याचे परवाने मिळण्यासाठी आॅनलाईन नोंदणी, परीक्षा सुरु केली आहे. मात्र शिकाऊ (लर्निंग) परवान्यासाठी १५० तर कायमस्वरुपी (परमनंट) परवान्यासाठी ११० उमेदवारांचे आॅनलाईन नोंदणी करता येते. त्यामुळे लर्निंगसाठी दीड ते दोन महिने तसेच परमनंट परवान्यासाठी अडीच ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते, अशी ओरड ड्रायव्हिंग स्कूल संचालकांची आहे.