शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे द्विशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:50 IST

अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९०८५ वर पोहोचली आहे. दर तीन दिवसांत संक्रमितांची संख्या १००० पार होत आहे.

ठळक मुद्देसोमवारी सहा मृत्यूसंक्रमितांची संख्या नऊ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाग्रस्तांची संसर्ग वाढत असतांना उपचारदरम्यान दगावलेल्या रुग्णांची संख्य देखील वाढतीच आहे. सोमवारी सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने ही मृत्यूसंख्या आता २०४ वर पोहोचली आहे. सोमवारी ३११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९०८५ वर पोहोचली आहे. दर तीन दिवसांत संक्रमितांची संख्या १००० पार होत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार उत्तमनगरातील ६५ वर्षीय पुरुष, मोर्शी येथील ६५ वर्षीय महिला, वरुड तालुक्यातील मंगरुळी येथील २९ वर्षीय पुरुष, शेंदूरजना खूर्द येथील ६० वर्षीय पुरुष, बडनेरा येथील ६० वर्षीय पुरुष व सार्सी येथील ४१ वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान मृत्यू झालेला आहे. सप्टेंबर महिण्याच्या १४ दिवसांत तब्बल ६९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे.

कोरोनााच संसर्ग दिवसेनदिवस वाढतच चालला आहे. सोमवारी विद्यापीठाद्वारा २६४ व रॅपीड अन्टीजनचे ४७ असे एकू ण ३११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९०८५ वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

पुन्हा ३११ पॉझिटिव्हजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार सोमवारी ३११ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकू ण संख्या ९०८५ वर पोहोचली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने ३९८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने कोरोनामुक्त व्तक्तींची संख्या ७०९१ वर पोहोचली आहे या सर्व व्यक्तींना आता १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४५४ रुग्ण विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस