शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची शिकार हुकली; कुत्रा जखमी, पगमार्क आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करता येत नाही, असे वनाधिकाऱ्यांचे टिपिकल उत्तर आहे.

ठळक मुद्देविद्यापीठात मुलींच्या वसतिगृहानजीक बिबट जोडप्यांचे वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रसायनशास्त्र विभाग परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका कुत्र्याचा माग घेतला. शिकार हुकली; मात्र हल्ल्यात कुत्रा जखमी झाला आहे. मंगळवारी मुलींच्या वसतिगृहानजीक बिबट्याचे पगमार्क आढळले. या घटनांनी सुरक्षा यंत्रणेची भंबेरी उडाली आहे.विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करता येत नाही, असे वनाधिकाऱ्यांचे टिपिकल उत्तर आहे. मात्र, एखाद्या वेळी पुढ्यात आलेल्या माणसावर बिबट्या हल्ला करू शकतो, अशी भीती सदोदित व्यक्त होत आहे.विद्यापीठात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रसायनशास्त्र विभाग परिसरात दोन सुरक्षा रक्षक गस्तीवर होते. त्यांच्या मागे काही अंतरावर एक कुत्रेदेखील चालत होते. बिबट्याने अचानक या कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याचा आवाज होताच सुरक्षा रक्षकांनी मागील बाजूस टॉर्चने प्रकाश टाकला. त्यामुळे उजेड पडताच बिबट्या शिकारीचा मनसुबा सोडून पळून गेला. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकामार्फत उपचार सुरू आहे. कुत्र्याच्या पाठीवर पंंजाचे निशाण, तर येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मनात बिबट्याची भीती कायम आहे.विद्यापीठात बिबट्या जोडपे दोन बछड्यांसह आहे. मंगळवारी रात्री बिबट आल्याचे पुरावे मिळाले आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहे. जखमी कुत्र्यावर उपचार केला जात आहे.- रवींद्र सयाम, सहायक कुलसचिव, सामान्य प्रशासन

टॅग्स :dogकुत्राleopardबिबट्या