शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णावर बलात्कार करणाऱ्या डॉक्टर जाधवानीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST

गुंगीचे औषध देऊन कारमध्ये कुकृत्याचे प्रकरण अमरावती : मित्राकडून व्याजाने पैसे काढून देतो, असे सांगून पाण्यातून गुंगीचे औषध ...

गुंगीचे औषध देऊन कारमध्ये कुकृत्याचे प्रकरण

अमरावती : मित्राकडून व्याजाने पैसे काढून देतो, असे सांगून पाण्यातून गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने विवाहित महिलेवर कारमध्ये अत्याचार केला. ही घटना चांदूर रेल्वे मार्गावर एसआरपीएफ क्वार्टरनजीक ७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. डॉक्टरविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवून गुरुवारी दुपारी त्या नराधमाला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

पोलीससूत्रानुसार, डॉ. लच्छुराम जाधवानी (४८, रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीचे फॅमिली डॉक्टर असल्याने त्याला महिलेची आर्थिक स्थिती माहिती होती. महिलेला बरे नसल्याने सोमवारी ती रात्री रुग्णालयात आली. रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरने सांगितले. कशाची चिंता आहे, अशी विचारणा केली. मुलीच्या शिकवणी वर्गाचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगताच डॉक्टरने, मित्र व्याजाने पैसे देतो, त्याकरिता कॅम्प परिसरात यावे लागेल, असे सांगून डॉक्टरने तिला कारमध्ये बसविले. नास्ता दिला. त्यानंतर बाटलीतून पाणी पाजले. महिलेला गुंगी आल्यानंतर चांदूर रेल्वे मार्गावर अंधारात कार थांबवून मागच्या सीटवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.