बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाने पुन्हा दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:34+5:30

अचलपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले एकमेव अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू महाराष्ट्रात ख्यातिप्राप्त आहेत. त्यांची कार्यक्षमता पाहता, त्यांना राज्यमंत्रिपद तसेच अकोला पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर ते पहिल्यांदा गावात येणार असल्याची माहिती बेलोरा ग्रामस्थांना मिळाली. गावातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर, मंदिर व मशिदीवर, घरांसमोर दिव्यांची रोषणाई केली होती.

Diwali again with minister of Bachu Kadu | बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाने पुन्हा दिवाळी

बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाने पुन्हा दिवाळी

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । बेलोऱ्यात मंदिर-मशिदीसह घरोघरी रांगोळी; दिव्यांची रोषणाई

सुमीत हरकूट।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : राज्यमंत्री झाल्यानंतर ना. बच्चू कडू शुक्रवारी प्रथमच स्वगृही अर्थात बेलोºयात पोहोचले. ग्रामवासीयांनी त्यांच्या स्वागतासाठी आपल्या घरी, गावातील रस्त्यांवर, मंदिर व मशिदीवर दिव्यांची रोषणाई केली होती. संपूर्ण बेलोरावासीयांनी नामदार बच्चू कडू यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. बेलोºयात यानिमित्त पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली.
अचलपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले एकमेव अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू महाराष्ट्रात ख्यातिप्राप्त आहेत. त्यांची कार्यक्षमता पाहता, त्यांना राज्यमंत्रिपद तसेच अकोला पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर ते पहिल्यांदा गावात येणार असल्याची माहिती बेलोरा ग्रामस्थांना मिळाली. गावातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर, मंदिर व मशिदीवर, घरांसमोर दिव्यांची रोषणाई केली होती. ग्रामपंचायत ते ना. कडू यांच्या घरापर्यंत रांगोळी, दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
बालमित्र शरद विधाते यांनी ना. कडू वाहनातून उतरताच त्यांचा आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी घराघरांतून महिला-भगिनींनी त्यांना ओवाळले. सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत मिरवणूक घरी पोहोचली तोच ना. कडू यांच्या आई इंदिराबाई, वडीलबंधू, वहिनी, नातेवाइक यांनी ओवाळणी करीत शुभेच्छा दिल्या. या भावविभोर सोहळ्याला उपसरपंच सचिन पावडे, माजी सरपंच स्वप्निल भोजने, बबलू ऊर्फ तुषार देशमुख, गौरव झगडे, भैया ठाकरे, श्याम कडूसह मोठ्या संख्येने बेलोरावासी उपस्थित होते.

दिवाळीचीही हॅट्ट्रिक
२०१९ मधील दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. यावेळी बच्चू कडू यांनी विजयी चौकार मारला. निकाल लागताच बेलोरा गावात रोषणाई व आतषबाजी करण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा नामदार बनलेल्या बच्चू कडू यांच्या स्वागतानिमित्त बेलोरावासीयांनी दिवाळी साजरी केली.

Web Title: Diwali again with minister of Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.