जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:54 IST2017-08-16T22:54:11+5:302017-08-16T22:54:36+5:30

श्वान भक्षण प्रकरणात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी दिली.

District Consumption Tribunal Committee soon meets | जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची लवकरच बैठक

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची लवकरच बैठक

ठळक मुद्देश्वान भक्षण प्रकरण : पोलिसांच्या कार्याचा आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्वान भक्षण प्रकरणात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांनी दिली. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर अध्यक्ष असलेल्या या समितीत १२ शासकीय अधिकारी चौकशी करणार आहे.
श्वान भक्षण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निर्देश पशूसंवर्धन विभागाला देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक निश्चित करण्यात येणार आहे. या बैठकीत १२ सदस्यीय समितीसमोर श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वान भक्षण प्रकरणाचा मुद्दा मांडल्या जाणार आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानंतर संबंधित अधिकारी पोलिसांनी आतापर्यंतचे कार्य तपासणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीयांच्या वसतीगृह परिसरातील घटनास्थळाचा आढावा घेऊन परप्रांतीय विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहे. हा संपूर्ण चौकशी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सादर केला जाईल.

जिल्हाधिकाºयाच्या अध्यक्षेत जिल्हा प्राणी क्लेश समिती गठीत असून त्यांच्या निर्देशानुसार लवकरच बैठक घेऊ. पोलिसांनी काय केले, नागरिकांचे म्हणणे व वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येईल.
- एम.यु. गोहत्रे,
उपायुक्त, पशूसंवर्धन विभाग.

Web Title: District Consumption Tribunal Committee soon meets