शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली झेडपीला नोटीस

By admin | Updated: January 11, 2017 00:10 IST

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे.

निवडणूक : आचार संहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देशअमरावती : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, संभ्रमामुळे काही ठिकाणी आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत अद्यापही विषय समितीच्या मासिक बैठकी सुरू आहेत. तसेच शासकीय वाहने देखील जमा करण्यात आली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिलीे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ४ जानेवारी रोजी जाहीर केला. त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता अमरावतीसह संपूर्ण विभागात अंमलात आली आहे. मात्र, आचारसंहितेबाबत अनेक शासकीय कार्यालयांत संभ्रम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद, महापालिका व अन्य सर्व विभागांना लेखी स्वरूपात ५ जानेवारी रोजी कळविण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही जि.प.मध्ये सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा पार पडली. यासभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नसला तरी विविध मुद्यांवर चर्चा झाली.दुसरीकडे मिनीमंत्रालयातील शिलेदारांची वाहने सुद्धा आचारसंहितेमध्ये धावत असल्याचे दिसून आल्याने याप्रकरणी सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईचा अहवाल मागविला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)घरपोच मिळणार ‘व्होेटर स्लिप’जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांना घरपोच ‘वोटर स्लिप’ पोहोचविली जाणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठलेही साहित्य वाटप होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सूचना तहसीलदार, पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.एसडीओ, तहसीलदारांवर धुराजिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी आणि १० पंचायत समितीच्या गणांसाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. सर्व तहसीलदारांकडे ‘एआरओ’ म्हणून जबाबदारी सोपविली आहे.एकाच वेळी निवडणुकीची शक्यतासध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच मनपा निवडणूक एकाचवेळी होण्याचे स्पष्ट केले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.