१९ कोटींच्या अनुदानाचे तालुक्यांना वितरण

By Admin | Updated: September 22, 2015 00:30 IST2015-09-22T00:30:08+5:302015-09-22T00:30:08+5:30

जिल्ह्यात मागील अतिवृष्टी व पुरामुळे काही भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Distribution of 19 crores subsidy to talukas | १९ कोटींच्या अनुदानाचे तालुक्यांना वितरण

१९ कोटींच्या अनुदानाचे तालुक्यांना वितरण

गतवर्षीचे नुकसान : शेती पिकांच्या नुकसानीचे ४४ लाख मिळणार
लोकमत विशेष
अमरावती : जिल्ह्यात मागील अतिवृष्टी व पुरामुळे काही भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच काही भागात गारपीट होवून पिके बाधित झाली होती. तांत्रिक कारणामुळे आपादग्रस्तांना हा निधी वाटप होऊ शकला नव्हता. याबाबत १९ कोटी ३ लाख १९ हजारांचे अनुदान जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना २१ सप्टेंबरला वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात २२, २३ व २७ जुलै २०१५ मध्ये झालेली अतिवृष्टी, धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे झालेले नुकसानीची मदत जिल्ह्यात यापूर्वीचे वाटप करण्यात आली. मात्र खरडून गेलेल्या जमिनीकरीता राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ चे आपत्कालीन मदतीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांना ४ कोटी ४२ लाख ८ हजारांचे अनुदान सोमवारी वितरित करण्यात आला.जून ते सप्टेंबर २०१३ दरम्यान अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेत जमिनीच्या नुकसानीचा निधी यापूर्वी वाटप केला होता. यामधील वाटप राहिलेला १५ लाख ११ हजार ५०० रुपयांचा निधी सोमवारी वाटण्यात आला. यंदा १ व २ जानेवारीला अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. यासाठी १३ एप्रिलचे शासन निर्णयानुसार अचलपूर तालुक्यात १ लाख ३१ हजार २५० रुपये व दर्यापूर तालुक्यात ३ लाख ५१ हजार २५० रुपयांच्या निधी सोमवारी वितरीत केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एप्रिल २०१५ मध्ये अवकाळी पावसाचे नुकसान झाले होते. याविषयी ३ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा निधीदेखील सोमवारी वितरित करण्यात आला.

२०१३ मधील उर्वरित निधीचे वितरण
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या निधी यापूर्वीच वाटप करण्यात आला.यामध्ये बाकी राहिलेला १ कोटी ५१ लाख ५०० हजारांचा निधी वितरित करण्यात आला. यामध्ये नांदगाव तालुक्याला ११ लाख २ हजार ५०० रुपये चांदूरबाजारला २ लाख ५ हजार, अंजनगाव सुर्जीला २० लाख ४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

Web Title: Distribution of 19 crores subsidy to talukas