शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीसमोर डेरा

By admin | Updated: November 10, 2014 22:36 IST

नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

अमरावती : नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्त (१० नोव्हेंबर) सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यावेळी अल्पसा मोबदला देऊन या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेतजमीन प्रकल्पात गेल्यानंतर त्यांना उपजिविकेचे इतर कोणतेही साधन नसून दिलेल्या तोकड्या रक्कमेत सध्याच्या महागाईच्या काळात जमीन घेणे अशक्य होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जमिनीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी केली आहे. मागणी मंजूर न झाल्यास हे शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. कलम २८ (अ) अंतर्गत २९६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली होती. मात्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २५० प्रकरणांचाच समावेश केला.मात्र उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना न्याय दिला नसल्याने अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यांना रोजगार द्या अन्यथा शेतीचा वाढीव मोबदला देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.उपोषण कर्त्यांमध्ये प्रवीण मनोहर, म. शकील म. नजीर, शे. इसमाईल शे. इसराईल, शे. दिवान शे. बुट्टू, रामकृष्ण पारवे, सुखदेवराव मेश्राम, पांडुरंग धनसुईकर, वासुदेव लव्हाळे, नारायण टाके, अ.बशीर शे. बट्टू, राजू पांडे, मारोतराव धंदेर, गणेश पांडे, माणिकराव विरुळकर व अन्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे.