शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्प उभारणीसाठी धोरण निश्चित

By admin | Updated: January 11, 2017 00:15 IST

राज्यातील विविध शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प राबविले जात आहेत.

पोलीस प्रशासनावर जबाबदारी : मार्गदर्शक तत्त्वे जाहीरअमरावती : राज्यातील विविध शहरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातील एकवाक्यतेचा अभाव पाहता हे प्रकल्प राबविण्यासाठी गृहविभागाने निश्चित असे धोरण ठरविले असून काही मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्यात आली आहेत. सार्वजनिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, अतिरेकी कारवाया रोखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण, वाहतूक नियंत्रण तसेच संवेदनशील भागांवर नियंत्रण ठेवण्यसाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण यंत्रणा बसविल्या जाते. या प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजना, आमदार फंड तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि सीसीटीव्ही संनियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत निश्चित असे धोरण नसल्याने प्रकल्प अंमलबजावणीत एक वाक्यता आणि सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यात आली आहेत. ज्या सीसीटीव्ही प्रकल्पामध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा ज्या प्रकल्पाची किंमत ५ कोटीपेक्षा अधिक असेल अशा प्रकल्पांचा विनंती प्रस्ताव संबंधित पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनी तयार करून तो पोलीस महासंचालक मुंबईमार्फत गृह विभागतर्फे सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्प राबविण्यासाठी स्थानिक प्रकल्प समितीवा पाठविण्यात येईल. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीसह महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस प्रमुख, सीईओ आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी राहील.कॅमेऱ्याची ठिकाणे, प्रकार, जोडणी पोलीस, वाहतूक विभाग आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद यांच्या गरजा विचारात घेऊन पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनी कॅमेरे बसविण्याची ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. अति वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख वाहूक जंक्शन, गुन्ह्याची गुन्हेप्रवण ठिकाणे, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक मिरवणुकीचे मार्ग, प्रमुख संरचना (जसे उड्डाणपूल, पूल, विजनिर्मिती केंद्र, वितरणाची ठिकाणे, धरणे, पाणीपुरवठा व पंप केंद्रे, जल शुद्धीकरण संयंत्रे, थोर व्यक्तीचे पुतळे इत्यादी) आणि शहराचे प्रवेश व निर्गमन नाके यांना प्राधान्य दिले जावे, तसेच महत्त्वाच्या शासकीय इमारतीकडे जाणारे मार्ग यांचाही समावेश असावा, असे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहे.