शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दशकात २९२ मोफत शस्त्रक्रिया

By admin | Updated: December 25, 2016 00:17 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील आदिवासी गाव वाई (खुर्द) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी

समाजसेवा : उच्चशिक्षित होऊन फेडले मातीचे ऋण संजय खासबागे  वरुड महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील आदिवासी गाव वाई (खुर्द) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन वैद्यकीय पदवी घेतलेले शाम सिरसाम यांनी जन्मभूमिशी नाळ कायम ठेवून वरूड येथील ग्रामीण रूग्णालयात स्त्रियांची तपासणी आणि नि:शुल्क शस्त्रक्रिया करीत आहेत. सेवेचे व्रत त्यांनी या काळातही जोपासले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या सिरसाम यांनी पैशाचा हव्यास न करता सेवाव्रत पुढे सुरू ठेवले आहे. ते सध्या अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी ते शासकीय सेवेतून वेळ काढून वरूड येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत उपचार आणि प्रसंगी मोफत शस्त्रक्रिया करतात. सन २००५ पासून सातत्याने त्यांचे हे व्रत सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल २९२ महिलांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्यात. दोन वर्षे यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, ४ वर्षे डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सेवा दिल्यांनतर आॅस्ट्रेलीया येथे पीएनजीमध्ये दोन वर्षे सेवा दिली. येथून परतल्यांनतर सावंगी मेघे येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुगणलयात साडेतीन वर्षे सेवा दिली. नांदेड येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि आणि आता अकोला येथे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहे. परंतु जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून सन २००५ पासून वरूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांच्या सोबतीने परिसरातील गरजू महिलांना महागडे न परवडणारे आरोेग्य उपचार आणि शस्त्रक्रिया ते मोफत करू लागले. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात महिन्याकाठी शिबिर घेऊन लावून गर्भाशयाचे कॅन्सर, तसेच स्त्रीरोगावरील मोफत उपचार सुरु केले. सन २०१६ पर्यंत २९२ महिलावर लेप्रोस्कोपीसह गर्भाशयाची शस्त्रक्रिया, महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्यात.