शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, एक भाजला

By admin | Updated: December 15, 2015 00:10 IST

शाळेच्या मधल्या सुटीत शाळेमागील शेतातील बोरे तोडायला गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

घटना : शाळेच्या सुटीत बोरे तोडणे जीवावर बेतलेपरतवाडा : शाळेच्या मधल्या सुटीत शाळेमागील शेतातील बोरे तोडायला गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान नजीकच्या शिंदी बु येथे घडली. हृषीकेश रवींद्र हागोणे (१४,रा. शिंदी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे तर हृषीकेश कैलाश दमाहे (१४,रा. शिंदी. बु) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात भाजला आहे. त्याच्यावर पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार सुरू आहेत. दोघेही शिंदीच्या दिगंबर पेठकर विद्यालयाचे विद्यार्थी होते. वर्गमित्र असल्याने सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुटीत ते दोघेही शाळेमागील बोरी झाडावर बोरे तोडायला गेले होते. बोराच्या झाडाला लागूनच विद्युत तारा गेल्या आहेत. त्यांचा स्पर्श फांद्यांना झाल्याने झाडामध्ये विद्युत प्रवाह संचारला होता. हृषीकेश हागोणे झाडावर चढून बोरे तोडत असताना त्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो झाडाखाली फेकला गेला. जमिनीवर पडल्याने त्याच्या डोक्याला दगडाचा मार बसला. त्याला तत्काळ परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. हृषीकेश दमाहे याचा हात भाजल्याने त्याच्यावर पथ्रोट येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)