शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरची ‘एक्सपायरी’ ग्राहक अज्ञानीच!

By admin | Updated: February 15, 2015 00:26 IST

दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच नाहीत. या नियमांबाबत वेळोवेळी 'अपडेट' ठेवणे हे गॅस कंपन्यांचे कर्तव्य आहे; ...

लोकमत विशेषसुरेश सवळे अमरावतीदैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच नाहीत. या नियमांबाबत वेळोवेळी 'अपडेट' ठेवणे हे गॅस कंपन्यांचे कर्तव्य आहे; तथापि ग्राहकांना अनभिज्ञ ठेवून गॅस कंपन्या त्यांचे व्यावसायिक लाभ साध्य करवून घेत आहेत. सिलिंडरला एक्सपायरी डेट असते, हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे? दचकलात ना! पण हे खरे आहे. सिलिंडरही एक्सपायर होते. अनुदानावर मिळणाऱ्या गॅस धारकांची संख्या जिल्ह्यात ४ लाखांपेक्षा अधिक आहे. प्रत्येक उत्पादनाला जशी निर्मितीची तारीख असते तसे ते उत्पादन किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहे याचाही अवधी त्या उत्पादनावर नोंदविला असतो. असाच अवधी घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या बाबतीतही आहे. त्यामुळे प्रत्येक गॅसधारकाने घरगुती व व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेताना संबंधित सिलिंडर तपासणे गरजेचे आहे. गॅस सिलिंडरच्या बाबतीत सुरक्षेचे काही मापदंड आहेत. त्यातील महत्त्वाचा घटक आहे. गॅस वितरक आणि गॅस एजन्सीच्या भाषेत सिलिंडरची ‘एक्सपायरी डेट’ यालाच ‘ड्यू फॉर फिजिकल टेस्टिंग’ असे संबोधले जाते. परंतु सर्वसामान्यांच्या भाषेत याला 'एक्सपायरी डेट' असेच म्हणणे संयुक्तिक ठरते. नवीन सिलिंडर घरी किंवा व्यवसायासाठी आणल्यानंतर त्याची पुनर्तपासणीची गरजच ग्राहकांना भासत नाही. याबाबतीत ग्रामीण भागात अनभिज्ञता दिसते. आपण घरगुती किंवा व्यावसायिक सिलिंडर घेत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.