शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

गंगाप्रसाद जयस्वाल यांच्याविरूध्द फौजदारी ?

By admin | Updated: May 14, 2015 00:08 IST

महापालिकेतील तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलातील गाळेधारकांसोबत ...

अमरावती : महापालिकेतील तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलातील गाळेधारकांसोबत परस्पर करारनामे करुन प्रशासनाची दिशाभूल, प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम रोखण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या ‘सर्चिंग’मध्ये नवीन घबाड उघड झाले आहे. अतिक्रमण आणि बाजार परवाना विभागाचा कारभार चालविणारे तत्कालीन अधिकारी गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रशासन किंवा सभागृहाची परवानगी न घेता करारनामा संपण्यापूर्वीच महापालिका संकुलातील गाळेधारकांसोबत परस्पर करारनामे करुन लाखोंची माया जमविल्याचे सत्य समोर आले आहे. महापालिकेने तहसील कार्यालयानजिक बीओटी तत्वावर खत्री कॉम्प्लेक्स निर्माण केले आहे. या संकुलात २१३ गाळे असून कंत्राटदारासोबतचा करार सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु जयस्वाल यांनी प्रशासनाला कोेणतीही माहिती न देता येथील गाळेधारकांसोबत २५ वर्षांसाठी करारनामा केल्याची बाब उघडकीस आली आहे. या संकुलात ५० गाळे रिक्त असताना ते परस्पर वाटप करण्यात आले. या नियमबाह्य प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त गुडेवार यांनी उपायुक्त चंदन पाटील यांना प्राथमिक चौकशीनंतर गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईचे निर्देश दिलेत. प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही जयस्वाल उपलब्ध झाले नाही.बँक खाती गोठविण्याचा निर्णय : संकुलातील गाळेधारकांसोबत केले परस्पर करारनामे जयस्वाल यांच्या संपत्तीला टाळे तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलात गैरप्रकार केल्याबद्दल प्रथम फौजदारी कारवाई करण्याचे प्रस्तावित असले तरी आयुक्तांनी त्यांची अचल संपत्ती, बँक खाती गोठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महापालिकेचा कारभार सतत चर्चेत येत असताना जयस्वाल यांच्या कारनाम्याने अधिकारीदेखील अवाक् झाले आहेत.सेवानिवृत्तीची रक्कम रोखलीगंगाप्रसाद जयस्वाल यांनी अपहार केल्याप्रकरणी लेखाविभागाला सेवानिवृत्तीची रक्कम रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लेखापाल शैलेंद्र गोस्वामी यांनी ही फाईल थांबविली आहे. जयस्वाल यांना सेवानिवृत्तीचे आठ ते नऊ लाख रुपये देणे बाकी होते. परंतु आयुक्तांच्या आदेशाने जयस्वाल यांची फाईल थांबली आहे.शहरात तब्बल १६ संकुलात गैरप्रकार झाल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली आहे. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची सखोल चौकशी केल्यास बरीच तथ्ये बाहेर येतील.- प्रवीण हरमकर, विरोधी पक्षनेता.खत्री कॉम्प्लेक्समध्ये परस्पर गाळे वाटपाचे करारनामे केल्याचे स्पष्ट झाले आहे. जयस्वाल यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्तांचे आहेत. लीज संपण्यापूर्वीच करारनामे केले गेले.- चंदन पाटील, उपायुक्त, महापालिका.