शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त पाण्याच्या टाकीला न्यायालयाची चपराक

By admin | Updated: September 11, 2014 23:11 IST

अचलपूर-परतवाडा येथे बांधण्यात आलेल्या वादग्रस्त पाण्याच्या टाकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशीत प्रतिवादीचीच निवड केल्याने ही समिती रद्द करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च

चौकशी समिती बरखास्त करण्याचे आदेश : नागपूर खंडपीठाचा निर्णयअचलपूर : अचलपूर-परतवाडा येथे बांधण्यात आलेल्या वादग्रस्त पाण्याच्या टाकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशीत प्रतिवादीचीच निवड केल्याने ही समिती रद्द करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ यांनी दिले आहेत. अचलपूर नगरपालिकेने परतवाडा टपालपुरा वॉर्ड क्रमांक ७ करिता चंद्रभागा पाणीपुरवठा योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर केली. परंतु काही फेरफार करुन ही टाकी वॉर्ड क्रमांक ९ शिवाजीनगर येथे बांधण्यात आली. टाकीच्या बांधकामासाठी आवश्यक मातीचा अहवाल दुसऱ्याच टाकीला जोडण्यात आला होता. टाकीच्या बांधकामाबाबत झालेल्या अनियमीततेमुळे येथील वयोवृध्द सामाजिक कार्यकर्ते नारायणराव पर्वतकर यांनी नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायाधीश बी.टी. धर्माधिकारी व सी.व्ही. भडांगे यांनी १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना नगरपालिका व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयातील रेकॉर्ड तपासण्याचे आदेश दिले होते. संबंधित रेकॉर्ड तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १३ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (सामाजिक बांधकाम विभाग) व नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्याची समिती नेमली होती. या समितीत प्रतिवादी असलेल्या मुख्याधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे या समितीवर आक्षेप घेऊन पर्वतकार यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी नुकतीच न्यायाधीश धर्माधिकारी व ए.एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर झाली. उच्च न्यायालयाने चौकशी समितीत प्रतिवादीचाच समावेश केल्यामुळे ही समिती रद्द करावी, असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० आॅक्टोबर रोजी होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)