शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार न्यायालयाने फेटाळली

By admin | Updated: March 27, 2016 00:07 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.

निर्णय जाहीर : परिवहन महांडळाची बाजू भक्कममोर्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली विरोधात तक्रार औद्योगिक न्यायालयाने फेटाळून लावत परिवहन महामंडळाच्या बाजूने निकाल दिला.येथील एसटी आगारात जय इंगोले आगार व्यवस्थापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी वाहतूकीसह कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासोबतच आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे महामंडळाचे कर्मचारी विशेषत: वाहक मोठ्या प्रमाणात दुखावले गेले आणि त्यांनी आगार व्यवस्थापकाविरुध्द आंदोलन केले होते. प्रकरण चिघळून प्रवाशांची गैरसोय होऊ नये या हेतूने महामंडळाने जयकुमार इंगोले यांची आगार व्यवस्थापक म्हणून दर्यापूरला तर दहा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव अमरावती विभागात वेगवेगळया आगारात बदली केली होती. बदली विरोधात दहा कर्मचाऱ्यांनी अमरावतीच्या औद्योगिक न्यायालयात अंतरिम स्थगनादेश मिळावा म्हणून प्रकरण दाखल केले होते. २७ जुलै रोजी न्यायालयाने त्यांचा अर्ज खारीज केला होता. त्याविरुध्द या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात (रीट पीटिशन) याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी औद्योगिक न्यायालयाने ६ महिन्यांच्या आत या प्रकरणाचा निपटारा करण्याचे शिवाय तोपर्यंत एसटी महामंडळाने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवण्याचे निर्देश ३१ आॅगस्ट रोजी दिले होते. औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि कागदोपत्री सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांची तक्रार फेटाळून लावली आहे.जिल्ह्यातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असताना आणि बदली झालेल्यांपैकी काही कर्मचारी तर कित्येक वर्षे मोर्शीलाच ठाण मांडून बसले होते, असे असताना बदली झाल्यानंतरही त्यांना मोर्शीचा मोह का आवरत नाही, हा प्रश्न मात्र येथे चर्चिल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)