शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी

By admin | Updated: December 20, 2014 22:30 IST

महानगरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ते निर्मितीची कामे दर्जाहीन आहेत. अशा दहा रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून ती क्वॉलिटी कंट्रोलच्या माध्यमातून तपासली जाणार आहेत.

अमरावती : महानगरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ते निर्मितीची कामे दर्जाहीन आहेत. अशा दहा रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून ती क्वॉलिटी कंट्रोलच्या माध्यमातून तपासली जाणार आहेत. यात महापालिकेतील अधिकारी, कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करणार, असा पवित्रा आमदार सुनील देशमुख यांनी घेतला आहे.
शासन किंवा महापालिकेत येणारा पैसा हा जनतेच्या करातून येतो. मात्र महापालिकेत दर्जाहिन कामे करण्यात आली ती गांभीर्याची बाब आहे. काही दिवसापूर्वी राठी नगर ते श्रीरामनगर या रस्त्याची पाहणी केली असता हा रस्ता अतिशय दर्जाहीन असल्याचे लक्षात आले. आॅक्टोबर महिन्यात तयार केलेला रस्ता डिसेंबरमध्ये उखडत असेल तर याला जबाबदार अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलिटी कंट्रोलकडे रस्ते निर्मितीत वापरल्या गेलेल्या साहित्याचे परीक्षण करण्याचे ठरविले आहे. महापालिकेत केवळ अर्थकारण जोपासण्याचे काम सुरु असल्याचा आरोप आमदार सुनील देशमुख यांनी केला.
दहा निकृष्ट दर्जांची यादी तयार
एकदा रस्ता तयार केल्यानंतर तो वर्षभर शाबूत रहावा असे करारात नमूद राहते. मात्र शासन निधी, विशेष अनुदान, १३ वित्त आयोग, मूलभूत सोई सुविधांच्या निधितून करण्यात आलेल्या विकास कामांची तपासणी करण्याचे ठरविले आहे. प्रारंभी दहा दर्जाहीन रस्त्याची यादी तयार करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करणार, असे सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले.
माझं काय, तुझं काय? यातून महापालिका बाहेर काढणार
महापालिकेत सुरु असलेल्या कमीशनराजमधून महापालिका बाहेर काढण्याचा संकल्प सुनील देशमुख यांनी घेतला. जनतेच्या कराचा पैशाचा होत असलेला अपव्यय थांबविण्यासाठी सहकारी सदस्य असतील तरी माझं काय, तुझं काय? यातून महापालिकेला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे सुनील देशमुख म्हणाले.