शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आलेख वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

अमरावती: कोरोना संक्रमित रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. गुरुवारी एकूण १५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची ...

अमरावती: कोरोना संक्रमित रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. गुरुवारी एकूण १५८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. मार्चपासून आतापर्यंत २२ हजार ४३४ संक्रमित रुग्ण आढळून आले तर, ४२३ जणांचा कोरोनाने बळी घेतला.

आरोग्य यंत्रणेच्या सूत्रानुसार, आसरा मोझरी येथील कोरोनाबाधित एका ६४ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकंदरीत २१३ संक्रमित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महापालिका हद्दीत ३३ तर, ग्रामीण भागात १०६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ३५२ असल्याची नाेंद करण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख ८१ हजार ९०० नमुने तपासले आहेत.

--------------------

धोक्याची घंटा वाजतेय

नवीन वर्षात जानेवारीपासून सातत्याने कोरोना संक्रमित रुग्ण वाढत असल्याने ही बाब जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. तसेच कोरोनाने दरदिवशी रुग्णांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. अचानक कोरोनाचा आलेख वाढत असताना नागरिक मात्र बेफिकिरपणे वावरत आहेत. मास्कचा वापर कमी झाला आहे. शारीरिक अंतराची नियमावली गुंडाळली आहे. बाजारपेठेत गर्दी वाढली असून कोरोना हद्दपार झाल्याच्या आविर्भावात नागरिक वावरत आहेत.