दीक्षांत समारंभावर कोरोनाचे सावट, ‘मॅनेजमेंट’मध्ये आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST2021-02-17T04:18:27+5:302021-02-17T04:18:27+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. मात्र, कोरोना संसर्गाची ...

Corona's convocation at the convocation ceremony, today's decision in 'Management' | दीक्षांत समारंभावर कोरोनाचे सावट, ‘मॅनेजमेंट’मध्ये आज निर्णय

दीक्षांत समारंभावर कोरोनाचे सावट, ‘मॅनेजमेंट’मध्ये आज निर्णय

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दीक्षांत समारंभाच्या आयोजनाची स्पष्टता बुधवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत होणार आहे. दीक्षात समारंभाविषयी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव तुषार देशमुख यांनी मंग़ळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, हे विशेष.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्राद्वारे विद्यापीठाने दीक्षांत समारंभाच्या आयोजनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे मागितले होते. जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याने गर्दी होऊ शकणा०या कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही, असे नवाल यांनी स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा- २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -१८९७ च्या अनुषंगाने संचारबंदी लागू झाली आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे दीक्षांत समारंभ आयोजनाला थेट परवानगी देता येणार नाही, हे आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे २१ फेब्रुवारीच्या दीक्षांत समारंभाला ऑनलाईन, तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे ऑफलाईन उपस्थित राहणार होते. आता कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

-----------

कोट

जिल्हाधिकाऱ्यांनी दीक्षांत समारंभाला थेट परवानगी दिली नाही. १२ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन करीत दीक्षांत समारंभ घेता येईल, असे म्हटले आहे. मात्र, दीक्षांत समारंभाचे आयोजनाबाबत बुधवारी ‘मॅनेजमेंट’ बोलावली असून, यात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे.

- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

Web Title: Corona's convocation at the convocation ceremony, today's decision in 'Management'