शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आता ११ केंद्रांवर कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

अमरावती : कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेने आता गती पकडली आहे. लक्ष्यपूर्ती लवकर व्हावी, यासाठी लसीकरण केंद्राची संख्या पाचऐवजी ११ केल्याचे ...

अमरावती : कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेने आता गती पकडली आहे. लक्ष्यपूर्ती लवकर व्हावी, यासाठी लसीकरण केंद्राची संख्या पाचऐवजी ११ केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

जिल्ह्यात लसीकरणासाठी सुरुवातीला नऊ केंद्रांवर आरोग्य यंत्रणेची तयारी होती. प्रत्यक्षात लसीकरण पाच केंद्रांवरच सुरू करण्यात आले. दरम्यान गुरुवारच्या व्हिसीत आरोग्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. यात लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास १४ फेब्रुवारी ‘डेडलाईन’ देण्यात आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेद्वारा जास्तीचे केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या व आता येथील नर्सिंग कॉलेज, पीडीएमएमसी, डेंटल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज व तखतमल तसेच तिवसा, चांदूर रेल्वे व वरूड ग्रामीण रुग्णालये, मोर्शी व दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयांत आता लसीकरण करण्यात येत असल्याचे समन्वयक करंजीकर यांनी सांगितले.

यापैकी नर्सिंग कॉलेजच्या केंद्रावरच फक्त कोव्हॅक्सिनची लस दिली जात आहे. उर्वरित १० केंद्रांवर कोविशिल्डची लस देण्यात येत आहे.

बॉक्स

आतापर्यंत ३,२४५ जणांना लसीकरण

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. यात ३,२४५ जणांचे लसीकरण करण्यात आलेले आहेत. १६ जानेवारीला ४४०, १९ ला २५८, २० ला ५५८, २२ ला ५५७, २३ ला ५७५, २५ ला ८५७ जणांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये कोविशिल्डचे ३११ व्हायलचा वापर झाल्याचे सांगण्यात आले.