शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:12 IST

अमरावती : शासकीय तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 'फ्रंटलाइन वर्कर्स'ने पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी व लसीकरण मोहीम ...

अमरावती : शासकीय तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 'फ्रंटलाइन वर्कर्स'ने पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी व लसीकरण मोहीम पुढच्या टप्प्यात जाऊन सर्वांना लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारीे केले.

शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील लसीकरण केंद्रात जाऊन जिल्हाधिकारी नवाल यांनी स्वत: लस घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, महाविद्यालयाचे अधिष्ठाता ए.टी. देशमुख, पद्माकर सोमवंशी, जयश्री नांदूरकर, काळे आदी डॉक्टर यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मास्कचा वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी पीडीएमसीला भेट देऊन पाहणी केली व स्वत: कक्षात जाऊन नोंदणी केल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेतून जात लस घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना कोविशील्ड लस देण्यात आल्याचे डॉ. नांदूरकर यांनी सांगितले.

होम आयसोलेशन तसेच खासगी दवाखाने, शासकीय रुग्णालयांनी लक्षणे असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना मोबाईल क्रमांक, पत्ता घेणे व रुग्णांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यांना घराबाहेर न निघणे, मास्क वापरणे, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आदी सूचना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी केले आहे.

बॉक्स

- अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करणार

होम आयसोलेशन मधील रुग्णांचे नोंदणी ‘होमआयसोलेशन अमरावती’ या संकेत स्थळावर करावी. हे संकेत स्थळ मोबाईल द्वारे नियंत्रित करता येते, होम आयसोलेशनमधील रुग्ण, गृह विलगीकरणाचे नियम कळत नसल्यास रुग्णांविरुद्ध रोग प्रसार व नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच रुग्णांनी स्वत:पासून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

बॉक्स

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची संपूर्ण नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्ण कुठे आहे, याची माहिती होईल. ७०३०९२२८५१, ७०३०९२२८५१ मोबाईल क्रमांकांवर नोंदणी करू शकणार आहे. रुग्णांचे मोबाईल नंबर घेणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णांशी व्हिडिओ कॉल, फोन कॉल करणे शक्य होईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.