शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST

पान २ ची बाॅटम मेळघाटात जनजागृतीसाठी कोरकू भाषेतून व्हिडीओपटांची मालिका : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम धारणी : कोरोना ...

पान २ ची बाॅटम

मेळघाटात जनजागृतीसाठी कोरकू भाषेतून व्हिडीओपटांची मालिका : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

धारणी : कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता आणि स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन मेळघाटात व्यापक लोकशिक्षण व जनजागृतीसाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’ ( कोरोना हरेल, मेळघाट जिंकेल) ही व्हिडीओपटांची मालिकाच तयार करण्यात आली असून, विविध माध्यमांतून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी ही माहिती दिली.

आवश्यक दक्षता घेऊन कोरोनापासून दूर राहता येते. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. साथीचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी दक्षतेचे महत्त्व नागरिकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. मेळघाटातील नागरिक बांधवांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत माहिती देणे आवश्यक होते, जेणेकरून कुटुंबातील सर्व जण ही माहिती जाणून घेऊ शकतील. त्यामुळे हा उपक्रम नियमितपणे सुरू करण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढेही विविध विषयांवर अशी माहिती प्रसृत करण्यात येणार असल्याचे सेठी यांनी सांगितले.

घरोघरी आरोग्य शिक्षण

मालिकेतील व्हिडीओद्वारे साथीचे संक्रमण, आजाराची माहिती, लक्षणे, घ्यावयाची काळजी, आवश्यक उपचार याबाबत एम.बी.बी.एस., एम.डी. असलेले डॉ. दयाराम जावरकर हे मेळघाटचे सुपुत्र अस्सल कोरकू भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधतात. ममता सोनकर यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यू-ट्यूब, फेसबूक, व्हाॅट्सॲप आदी सोशल मीडियाद्वारे ही व्हिडीओपटांची मालिका नियमित प्रसारित करण्यात येत असून, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाबाबत सर्व शंकांचे निरसन या माहितीतून होते. नागरिकांना आरोग्य शिक्षण देणारे एक नवे माध्यमच याद्वारे उपलब्ध झाले आहे. आरोग्यतज्ज्ञांबरोबरच प्रशासनातील विविध अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत व नानाविध विषयांची माहिती नागरिकांना स्वत:च्या भाषेत घरबसल्या मिळू लागली आहे, असेही सेठी यांनी सांगितले.

सुलभ संवाद

अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती स्थानिक नागरिकांना बरेचदा मराठी व हिंदी माध्यमातून मिळते. मात्र, तांत्रिक किंवा महत्त्वाची माहिती स्थानिक बांधवांना जाणून घेणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम अस्सल कोरकू भाषेत सुरू करण्यात आला आहे. यात माहिती देणारी डॉक्टर मंडळी ही स्थानिकच असल्याने अत्यंत सुलभ भाषेत ते व्हिडीओद्वारे नागरिकांशी संवाद साधतात.

कोट

मेळघाटसारख्या दुर्गम भागात दृक्श्राव्य माध्यम परिणामकारक ठरते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाबाबत स्थानिकांकडून अत्यंत स्वागतार्ह प्रतिक्रिया मिळत आहेत. कोरकू भाषेतून यापूर्वीही विविध संदेश प्रसारित केले आहेत. त्याचबरोबरच, आरोग्य शिक्षण देणारी ही मालिका नियमितपणे प्रसारित करण्यात येईल.

- मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी