शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना त्रिसूत्रीचे पालन नाहीच, शहरात २७ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

महापालिकेची धडक कारवाई, मास्‍क न लावणे, शारीरिक अंतर, सार्वजनिक स्‍थळी थुंकणारे लक्ष्य अमरावती : कोरोना संसर्ग वाढतच आहे. ...

महापालिकेची धडक कारवाई, मास्‍क न लावणे, शारीरिक अंतर, सार्वजनिक स्‍थळी थुंकणारे लक्ष्य

अमरावती : कोरोना संसर्ग वाढतच आहे. नागरीक बेफिकीरपणे वागत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सोमवारी राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे कोरोना त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

अमरावती शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असताना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सोमावरी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात झोन क्रमांक १ रामपुरी कॅम्प अंतर्गत पंचवटी, गाडगेनगर, इतवारा, लक्ष्मीनगर या ठिकाणी दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. यादरम्यान २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. झोन क्रमांक २ राजापेठ अंतर्गत इर्विन चौक, रुक्मिणीनगर येथे दंडात्‍मक कारवाईत ३३०० रुपये दंड वसूल करण्‍यात आला. झोन क्रमांक ३ दस्तुरनगर अंतर्गत दस्तुरनगर, गर्ल्स हायस्कूल चौक, जयस्तंभ या भागात दंडात्‍मक कारवाईत ११ हजार रुपये दंड वसूल करण्‍यात आला. झोन क्रमांक ४ बडनेरा अंतर्गत नवाथे चौक येथेे दंडात्‍मक कारवाईत ५२०० रुपये दंड वसूल करण्‍यात आला. झोन क्रमांक ५ भाजीबाजार अंतर्गत चित्रा चौक येथे दंडात्‍मक कारवाईत ५००० रुपये दंड वसूल करण्‍यात आला. सोमवारी दंडात्‍मक कारवाईदरम्यान एकूण २७ हजार रुपये दंड वसूल करण्‍यात आला. या मोहिमेमध्ये ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शेख, विजय भुरे, कुंदन हडाले, राजू डिक्याव, विक्‍की जैदे यांच्यासह स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते.

००००००००

कोट

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सार्वजनिक स्‍थळी थुंकणे, मास्‍क न वापरणे, शारीरिक अंतर न पाळणे अशा व्यक्तींविरुद्ध दंडात्‍मक व फौजदारी कारवाईसाठी पथक नेमण्यात आले आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहील.

- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका.