शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पुन्हा आठ दगावले, ७५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना उद्रेक लक्षात घेता, त्यावर नियंत्रणासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह एकूणच यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना संक्रमितांची संख्या लक्षणीय ठरत आहे. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी शहरात कुठल्याही अत्यावश्यक कारणाशिवाय अकारण फिरणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देसमूह संसर्गाचा धोका, ‘लॉकडाऊन’ वाढण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाने शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू झाला, तर ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले. १९८३ नमुन्यांच्या तपासणीतून ही संख्या पुढे आली आहे. जिल्ह्यात आता संक्रमितांची संख्या एकूण ३३ हजार ५८५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना उद्रेक लक्षात घेता, त्यावर नियंत्रणासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह एकूणच यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असताना संक्रमितांची संख्या लक्षणीय ठरत आहे. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी शहरात कुठल्याही अत्यावश्यक कारणाशिवाय अकारण फिरणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 
गत २४ तासांत कोरोनाने आठ बाधितांचा मृत्यू झाला. यात स्वस्तिकनगरातील ७० वर्षीय पुरुष, विलासगनरातील ५७ वर्षीय पुरुष, बेलपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, दर्यापूर येथील ६३ वर्षीय पुरुष, महाजनपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, द्वारकानगर (परतवाडा) येथील ५३ वर्षीय महिला, अमरावती येथील राष्ट्रसंत कॉलनी येथील २८ वर्षीय पुरुष व गजानननगर येथील  ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एकंदरीत सात पुरुष आणि एक महिलेचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंत ४९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
शुक्रवारी एकूण ७५४ पॉझिटिव्ह आढळून आले असून, ५९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात २३५७, तर ग्रामीण भागात ११२६ रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४७३२ इतकी आहे. 
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ८४.४४ टक्के एवढा खालावला आहे. डबलिंग रेट १०५ दिवसांवर आला आहे. मृत्युदर अद्याप १.४७ टक्के आहे. जिल्हाभरातून एकूण २ लाख २० हजार ४८९ नमुने चाचणी झाली आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या