शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजार पालिकेच्या गोदामावर व्यापाऱ्याचा ताबा

By admin | Updated: November 11, 2014 22:32 IST

स्थानिक नगरपरिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूला असलेले पालिकेच्या मालकीचे टीन शेडमधील गोदामात सध्या एका व्यापाऱ्याने आपले दुकानाचे साहित्य साठवून अवैध ताबा मिळविला आहे.

चांदूरबाजार : स्थानिक नगरपरिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूला असलेले पालिकेच्या मालकीचे टीन शेडमधील गोदामात सध्या एका व्यापाऱ्याने आपले दुकानाचे साहित्य साठवून अवैध ताबा मिळविला आहे. तसेच या गोदामाला स्वत:चे कुलूप ठोकल्याचे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. या चर्चेची दखल घेत सत्तारुढ गटाच्या गोपाल तिरमारे या नगरसेवकाने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नगरपरिषदेत सद्या प्रहारची सत्ता आहे. प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी येथील कार्यक्षेत्रात कोट्यावधीचा निधी देऊन गल्लीबोळातील रस्ते, नाल्यासह स्मशान व चौकाचे सौंदर्यीकरण करवून घेतले. मात्र शहरातील अवैध अतिक्रमणामुळे या विकासाचे तीनतेरा झाले आहे. अशातच चक्क गोडावून व त्यातील जागेचा व्यापाऱ्याने घेतलेल्या अवैध ताब्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासनात नेमके काय चालले आहे असा प्रश्न आता सामान्य नागरिकासमोर निर्माण झाला आहे. आठवडीबाजार ओळीत नगरपरिषदेची जुन्या कार्यालयाची इमारत आहे. त्याचे पश्चिमेकडे टिनशेड नं. २ मध्ये ३० बाय ४० फुटाच्या जागेवर गोडावून उभारण्यात आले. यात जकात वसुलीचे काळात व्यापाऱ्याचा माल साठवण्यात येत होता. जकात वसुली बंद झाल्यावर या गोडावूनमध्ये पालिकेच्या मालकीचे साहित्य ठेवले होते. कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज जुनी इमारत व गोडावूनच्या सभोवताल छोट्या दुकानदारांनी अतिक्रमण करून जुने कार्यालय व गोडावूनला घेरुन घेतले आहे. या काळात येथीलच एका व्यापाऱ्याने या गोडावूनमधील जुने साहित्य काढून त्यात आपला माल भरला व अवैध ताबा घेऊन गोडावून वापरण्याला सुरूवात केली.या बाबीची दखल पालिकेच्या कर विभागाचे कर निरीक्षकांनी घेणे अपेक्षित असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत गोपाल तिरमारे यांनी त्यांना विचारणा केली असता गोलमाल उत्तर देऊन प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केल्याचे तिरमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.