शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत कंत्राटदारांची बैठक

By admin | Updated: June 25, 2015 00:17 IST

बांधकाम कंत्राटदारांचे महापालिकेकडे थकीत असलेल्या २५ कोटी रुपयांच्या देयकांपैकी काही तरी पैसे द्या, तरच नवीन कामे करु, ...

अमरावती : बांधकाम कंत्राटदारांचे महापालिकेकडे थकीत असलेल्या २५ कोटी रुपयांच्या देयकांपैकी काही तरी पैसे द्या, तरच नवीन कामे करु, असा एकमुखी सूर कंत्राटदारांनी आवळला. मात्र, दर्जेदार कामे करा, पैसे मिळतील, असे म्हणत आयुक्तांनी कंत्राटदारांना दिलासा दिला. पैसे देण्यास उशीर झाल्यास एक टक्का व्याज देऊ, अशी हमी आयुक्तांनी दिली.महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षस्थानी कंत्राटदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त चंद्र्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, प्रभारी शहर अभियंता जीवन सदार आदी उपस्थित होते. दरम्यान कंत्राटदारांना एसीबीमार्फत चौकशी सुरु केली जाईल, अशी तंबी देण्यात आली. कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन कुचकामी ठरल्याप्रकरणी पदाधिकाऱ्याांनी सवाल उपस्थित केला. कंत्राटदारांची बाजू ऐकून घेताना देयके मिळणारच. केवळ दर्जेदार कामे करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. बांधकाम कंत्राटदारांनी थकीत रक्कमेचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. थकीत रक्कम मिळाल्याशिवाय नवीन कामे कशी करायची, असा प्रश्न कंत्राटदारांनी उपस्थित केला. परंतु कामे करायची नसेल तर पर्यायी यंत्रणा उभारु, असे आयुक्त गुडेवार म्हणाले. तेव्हा उपस्थित सर्वच कंत्राटदारांनी समर्थन देत बाहेरील कंत्राटदार आणूृन कामे करु शकता, काहीही हरकत नाही, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली. सभागृहात तणाव निर्माण झाल्याचे लक्ष्यात येताच आयुक्तांनी संयम बाळगत कंत्राटदारांची बाजू ऐकून घेतली. जुन्या कामांचे थकीत देयके मिळतीलच. नवीन कामेदेखील दर्जेदार करा, असे म्हणत कंत्राटदारांना आपलेसे केले. मी कोणावरही अन्याय करीत नाही. मात्र फसवणूक, बदमाशी केली तर सोडणार नाही, असा समज आयुक्तांनी दिला.