शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीसाठी कंत्राटी समन्वयकांची झेडपीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:16 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मेळघाटात कंत्राटी तत्त्वावर सन २००७ पासून समुपदेशकांची जबाबदारी सांभळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेतनवाढ मिळाली नाही.

निवेदन : अतिरिक्त सीईओंसमोर मांडली व्यथाअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मेळघाटात कंत्राटी तत्त्वावर सन २००७ पासून समुपदेशकांची जबाबदारी सांभळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेतनवाढ मिळाली नाही. त्यामुळे ही शासन धोरणानुसार वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी अतिरिक्त सीईओ प्रकाश तट्टे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.मेळघाटमधील आदिवासी तथा सर्वसामान्य लोकांना, लहान मुलांना ० ते ६ वयोगट व त्यावरील बालक गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना शासनाचा आरोग्य सेवा त्वरित मिळावी याकरिता कार्यरत असणारे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. मात्र सन २००७ पासून आम्ही अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना एनआरएचएम, एनएचएमच्या कार्यक्रमांतर्गत सुरूवातीला देण्यात येणारे १० टक्के वाढ देण्यात आली नाही. याशिवाय आता ५ टक्के वाढसुद्धा देण्यात आली नाही. दरवर्षी इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे समुपदेशकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वाढ देण्यात येत नाही. तसेच एनएचएमअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, येथील मेळघाट सेलमधील समन्वयक यांना दरवर्षी ३००० रुपये मोबाइल बिल मिळत होते. मात्र सदर बिलसुध्दा सन २०११ पासून मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन शासनाने एनआरएचएम, एनएचएम अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना देण्यात आलेली वाढ व मोबाइलचे थकीत देयके त्वरित अदा करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन देतेवेळी अविनाश ठवरे, प्रकाश खडके, शकुंतला कास्देकर, अलका झामरकर, हादू मुसूम, शारदा धांदे, नामदेव धांडे, कमल दारसिंबे, हरिलाल कास्देकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)