शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

निम्न पेढी प्रकल्पबाधितांनी रोखले धरणाचे बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:01 IST

अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम पूर्ववत सुरू करण्याचे आदेेश दिले. त्यामुळे शुक्रवारपासून अळणगावनजीकच्या प्रकल्प भिंतीजवळ कामाला सुरुवात होणार होती. मात्र, ती माहिती अळणगाव, गोपगव्हान, कु्ंड खुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा सातुर्णा या प्रकल्पबाधित गावांना समजताच गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांनी धरणाची भिंत गाठली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अळणगाव व गोपगव्हाण येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्विचार याचिका रद्दबातल ठरविल्या. सबब, निम्न पेढी प्रकल्पाच्या बांधकामास ३० डिसेंबरपासून नव्याने सुरुवात करण्यात आली. मात्र, ते काम सुरू होण्यापूर्वी पेढी प्रकल्पबाधितांनी शेकडोंच्या संख्येत बांधकामस्थळी धाव घेतली. काम रोखले. त्यामुळे मोठा गहजब उडाला. भातकुली तालुक्यातील निंभा येथे पेढी नदीवर निम्न पेढी सिंचन प्रकल्प निर्माणाधीन आहे. १६१ कोटींची मूळ प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पाची किंमत १६३९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. मात्र, वाढीव मोबदल्यासाठी अळणगाव व गोपगव्हाण येथील ३०० लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे प्रकल्पाचे काम थांबले होते. दरम्यान, २३ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने दोन्ही पुनर्विचार याचिका रद्द केल्याने अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम पूर्ववत सुरू करण्याचे आदेेश दिले. त्यामुळे शुक्रवारपासून अळणगावनजीकच्या प्रकल्प भिंतीजवळ कामाला सुरुवात होणार होती. मात्र, ती माहिती अळणगाव, गोपगव्हान, कु्ंड खुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा सातुर्णा या प्रकल्पबाधित गावांना समजताच गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांनी धरणाची भिंत गाठली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. त्यामुळे तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर कंत्राटदाराने कामास सुरुवात केली नाही. घटनास्थळी अधीक्षक अभियंता आकेवार व कार्यकारी अभियंता गणेश कथले यांनी भेट दिली. मध्यस्थीचा प्रयत्नदेखील केला. यात साहेबराव विधळे, मनोज चव्हाण, गौतम खंडारे, अविनाश सनके, विलास गावनेर, श्रीकृष्ण बैलमारे आदी ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या.

प्रकल्पबाधितांच्या आंदोलनामुळे काम थांबविले आहे. त्यांच्या मागण्या शासनस्तरावरील आहेत. विधायक मार्गाने मागण्या मांडाव्यात. मात्र, काम थांबविणे योग्य नाही. न्यायालयाने दोन्ही याचिका रद्द केल्याने काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.गणेश कथले, कार्यकारी अभियंताअमरावती प्रकल्प बांधकाम विभाग

 

टॅग्स :Damधरण