शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

गतिमानतेसाठी ई-आॅफिस संकल्पना महत्त्वाची

By admin | Updated: May 2, 2015 00:26 IST

प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. गतिमानता येते, ...

विभागीय आयुक्त : संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनअमरावती : प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. गतिमानता येते, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ई-आॅफिस संकल्पना आत्मसात करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.येथील सहसंचालक लेखा व कोषागारे विभागाच्यावतीने लेखा कोषभवन येथे आयोजिलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्र व 'टेक डे' चे उद्घाटन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी उपस्थित होते. स्थानिक निधी लेखा सहसंचालक बी. व्ही. तांबडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राजूरकर म्हणाले की, शासनाची कामकाजातील पारदर्शकता आणि गतिमानता यावर विशेष भर आहे. यासाठी प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. ई-आॅफिससंदर्भात बैठका होत आहेत. संपूर्ण कामकाज अद्यापही १०० संगणकांवर झालेले नाही. प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. अर्थ विभागामुळे शासनाच्या सर्वच विभागात शिस्त आहे. त्यामुळे लेखा व कोषागारे विभाग हा महत्त्वाचा आहे. प्रशिक्षणासाठी वयाची आणि पदाची गरज नाही. सर्वांनीच संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे आणि ई-आॅफिस संकल्पना आत्मसात करावी, असे आवाहन केले. लेखा कोषभवन इमारतीत प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही याठिकाणी प्रशिक्षण देण्यात यावे.सीईओ भंडारी यांनी लेखा व प्रशिक्षणाचे कामकाजातील महत्त्व सांगून सेवापुस्तके आॅनलाईन करण्याचा प्रयत्न करावा. काही ठिकाणी हा प्रयोग होत असून अशा कामाची गती वाढविण्याची त्यांनी गरज प्रतिपादित केली.सहसंचालक बी. व्ही. तांबडे म्हणाले की, येथे दर शुक्रवारी विना मोबदला दोन तास प्रशिक्षण देण्यात येते याचा सर्वांनी लाभ घ्यावा. प्रास्ताविकात सहसंचालक सुधाकर सिद्धेवाड म्हणाले की, आॅगस्ट २०१४ पासून या कार्यालयास प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले आहे. याच कोषागारे, ५० उपकोषागारांमार्फत येणारा सर्व निधी आहारित केला जातो. जमेच्या बाजू सर्व कोषागारामार्फत होतात. मनुष्यबळाची अडचण असली तरी सर्व कोषागारांचे पेमेंट सीएमपीद्वारे होते. तसेच ३९ उप कोषागारांमार्फतही सीएमपीद्वारे पेमेंट होते. सर्वांनी सीएमपी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या कार्यालयाकडून ११ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेत. ७१४१४ निवृत्तीवेतन धारकांना १ तारखेस सीएमपीद्वारे पेमेंट करण्यात येते. सेवानिवृत्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉल सेंटर फॉर पेन्शनर्स उपक्रमही राबविला जातो. २४ तासांच्या आत आॅनलाईन तक्रार सोडविण्यात येते. (प्रतिनिधी)