शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कम्पोस्ट डेपोत तीन लाख केव्हिक मीटर कचरा तुंबून

By admin | Updated: October 3, 2015 00:19 IST

सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत तीन लाख मीटर कचरा तुंबून असल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे.

आजार बळावतोय : सीमेवरील नागरी वस्त्यांना धोकाअमरावती : सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत तीन लाख मीटर कचरा तुंबून असल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली नाही तर सीमेवरील नागरी वस्त्यांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हल्ली वातावरण विषाणुजन्य असल्याने लहान मुलांचे आजार बळावले आहे.अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश झाला ही आनंददायी बाब असली तरी कम्पोस्ट डेपोत तुंबून राहणाऱ्या कचऱ्याची समस्या कधी सुटणार हा प्रश्न निरुत्तरीय आहे. कम्पोस्ट डेपोतील कचऱ्याची टेकडी ही आता ७० ते ८० फुटावर पोहचली असून जागेअभावी तिची उंची वाढतच चालली आहे. तर कचऱ्याची उंच टेकडी समांतर करण्यासाठी बुलडोजरची मदत घेतली जात आहे. यापूर्वी कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प साकारण्याची जबाबदारी हरियाणाच्या गुडगाव येथील इको फिल कंपनीकडे सोपविण्यात आली होती. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन जागेवर हा प्रकल्प साकारण्यासाठी अकोली रेल्वे लाईन जवळील १८ हेक्टर जमीन हस्तातरीत करण्यात आली होती. परंतु खत निर्मितीसाठी जागा अधिग्रहणाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मध्यस्थी करुन कम्पोस्ट डेपोसाठी नवीन जागा शोधण्याचे ठरवित प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार महसूल विभागाने ई क्लास जमिनीचा शोध घेतला. परंतु ई क्लास जमिन कम्पोस्ट डेपोकरीता मिळाली नसल्याची माहिती आहे. ९ हेक्टर जागेवर हल्ली असलेल्या कम्पोस्ट डेपोत दरदिवसाला कचरा साठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही. त्यामुळे कम्पोस्ट डेपो परिसर जीवघेणी ठरु लागला आहे. या कम्पोस्ट डेपोत घाण, मृत प्राण्यांचे अवशेष, केर कचरा, कुजलेले पदार्थ तुंबून राहत असल्याने सीमेवरील नागरी वस्त्यांना गंभीर आजार होण्याची दाट शक्यता आहे. कचरा डेपोची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.