शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-बुऱ्हानपूर मुख्य मार्गाचे मोजमाप पूर्ण

By admin | Updated: December 11, 2015 00:45 IST

शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचे गुरुवारी सामाजिक बांधकाम विभागाकडून ८० फुटांपर्यंतचे मोजमाप करण्यात आले आहे.

अन्यथा गजराज चालणार : १४ डिसेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची ताकीदश्यामकांत पाण्डेय धारणीशहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचे गुरुवारी सामाजिक बांधकाम विभागाकडून ८० फुटांपर्यंतचे मोजमाप करण्यात आले आहे. १४ डिसेंबरपर्यंत अतिक्रमितांना स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी डेडलाईन देण्यात आले असून १४ डिसेंबरलनंतर गजराज चालणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळपासून एपीएमसी नाक्यापासून एस्सार पेट्रोलपंपपर्यंत एबी रोडचे रस्त्याच्या मध्यपासून दोन्ही बाजूवरील ४०-४० फुटापर्यंत मोजणी करून मार्किंंग करण्यात आले. यावेळी सा. बां. चे अभियंते अभय बारब्दे व मंगेश खरळ यांनी पंचनामे तयार केले. आज जवळपास १०० च्यावर अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणकाऱ्यांना १४ डिसेंबरपर्यंत डेडलाईन जारी करण्यात येणार आहे. नवनियुक्त नगरपंचायतच्या पहिल्याच बैठकीत अतिक्रमण ३६ फुटापर्यंतच काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत सामाजिक बांधकाम विभागकार्यकारी अभियंता भावे यांनी तत्काळ ८० फुटांपर्यंत मोजमाप करण्याचे निर्देश उपअभियंता पाटणकर यांना दिले होते. त्यानुसार आजची मोजमाप कार्यवाही सुरू असताना लोकांमध्ये उत्सुकता वजा भयाचे वातावरण पाहावयास मिळाले.