शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासोबत चल, नाहीतर अंगावर अ‍ॅसिड फेकतो; निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:44 IST

Amravati news अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देऊन एका तरुणीचे दुचाकीवर अपहरण करून तिला एका निर्जनस्थळी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील रामपुरी कॅम्प परिसरात शनिवारी रात्री उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: : अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देऊन एका तरुणीचे दुचाकीवर अपहरण करून तिला एका निर्जनस्थळी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील रामपुरी कॅम्प परिसरात शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला.पोलीस सूत्रानुसार, राहुल बिशमदास गुलानी (राहणार रामपुरी कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे. १९ वर्षीय तरुणीने यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी ही बी.कॉम. तृतीय वषार्चे शिक्षण घेत असून आरोपी हा मुलीच्या वस्तीत राहतो. मागील आठ ते नऊ महिन्यापासून तो मुलीला फोनवर त्रास देत होता. तिने त्याचा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला असता, आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करणे सुरूच ठेवले. त्याने तिला व्हॉट्सप व सोशल मीडियावरसुद्धा मेसेज टाकून त्रास दिला.

ही मुलगी शनिवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडली असता, ती पत्रकार कॉलनीतून दुचाकीने जात असताना आरोपीने तिला वाटेतच अडविले. तिची दुचाकी थांबवून त्याने चावी ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने सोबत आणलेली ब्राऊन कलरची अ‍ॅसिडची बॉटल तिला दाखवून ऍसिड अंगावर फेकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणी घाबरली. त्यानंतर त्याची दुचाकी तिथेच ठेवून तो तरुणीच्या दुचाकीवर बसला व तिला तिची दुचाकी सहकारनगरच्या दिशेने चालविण्यास सांगितली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन तिचे तोंड दाबून तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला.

पीडिता घरी आल्यानंतर तिने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. आरोपी सध्या फरार असून आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३५४ (ड), ३४१, ५०६, ३२६ (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास गाडगेनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी