कलेक्टर शुक्रवारी गावात मुक्कामी

By Admin | Updated: June 10, 2014 23:45 IST2014-06-10T23:45:54+5:302014-06-10T23:45:54+5:30

गावात अडचणी आहेत पण शासकीय अधिकारी कधीच आले नाहीत. गाव दुर्गम भागात त्यामुळे शासकीय योजना पोहोचल्या नाहीत अशा गावातील लोकांना कदाचित वाटत असेल की प्रशासन आपल्यासाठी नाहीत.

Collector fights in the village on Friday | कलेक्टर शुक्रवारी गावात मुक्कामी

कलेक्टर शुक्रवारी गावात मुक्कामी

१३ जूनचा मुहूर्त : दुर्गम भागाला प्राधान्य
अमरावती : गावात अडचणी आहेत पण शासकीय अधिकारी कधीच आले नाहीत. गाव दुर्गम भागात त्यामुळे शासकीय योजना पोहोचल्या नाहीत अशा गावातील लोकांना कदाचित वाटत असेल की प्रशासन आपल्यासाठी नाहीत. यापुढे मात्र हा समज खोटा ठरु शकतो. जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा गावात मुक्कामी येऊ शकतात.
राज्याचे मुख्य सचिव एस. सहारीया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि सीईओ दोन वेगवेगळ्या गावात मुक्कामाला जाणार आहेत. स्वत: सहारीया यांनी एका दुर्गम गावात मुक्काम करून याची सुरुवात केली. त्यानंतर गेल्या शनिवारी बहुतांश जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात हा प्रयोग केला.

Web Title: Collector fights in the village on Friday