शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीतील कोळशाला पुन्हा आग

By admin | Updated: March 29, 2016 00:03 IST

मालगाडीतील कोळशाच्या डब्याला आग लागल्याची घटना सोमवार २८ मार्च रोजी घडली.

पंधरवड्यातील दुसरी घटना : बडनेरा स्थानकावर घडू शकतो अनर्थबडनेरा : मालगाडीतील कोळशाच्या डब्याला आग लागल्याची घटना सोमवार २८ मार्च रोजी घडली. अग्निशमन दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. पंधरवड्यात बडनेरा स्थानकावर कोळशाच्या मालगाडीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. या ट्रॅकवरील विद्युत पुरवठा खंडित करून आग विझविली गेली. मांजरी खदान येथून नाशिककडे जाणारी ६० डब्यांची कोळशाने भरलेली मालगाडी सोमवारी सकाळी ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचली. इंजीनपासून दहाव्या क्रमांकाच्या डब्यातील कोळशाने पेट घेतल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने स्टेशन प्रबंधक आर.टी. कोटांगळे यांना माहिती दिली. अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझविण्यात आली. स्टेशन प्रबंधक कोटांगळे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक सुनील डोंगरे, जी.आर. साबळे, मडावी घटनास्थळी पोहोचले होते. उन्हाळ्यात घर्षणाने कोळशाला आग लागते. याशिवाय इतर कोणत्या कारणांनी तर मालगाडीतील कोळशाला आग लागते का? हे रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा बलाला तपासावे लागेल. (शहर प्रतिनिधी)हाय व्होेल्टेज लाईनमुळे संभवतो अपघात मालगाडीच्या डब्यातील कोळशाला आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावर दरवर्षी अशा पाच ते सात घटना घडतात. आजवर यातून मोठा अनर्थ घडला नाही. मात्र, रेल्वे स्थानकावरून गेलेल्या हाय व्होल्टेज लाईनला आगीचे लोळ भिडल्यास मोठे अग्निकांड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगीच्या या प्रकारांवर वेळीच अंकुश लावण्याची गरज आहे.