शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महानगरात स्वच्छतेचा बोजवारा

By admin | Updated: May 14, 2014 01:59 IST

महापालिका अर्थसंकल्पात स्वच्छतेसाठी सर्वाधिक तरतूद असताना महानगरात तुंबलेल्या नाल्या आणि कचऱ्याचे ढिगारे ही नित्याचीच बाब झाली आहे.

अमरावती : महापालिका अर्थसंकल्पात स्वच्छतेसाठी सर्वाधिक तरतूद असताना महानगरात तुंबलेल्या नाल्या आणि कचर्‍याचे ढिगारे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे साफसफाईवर होत असलेला कोट्यवधींचा खर्च निर्थक ठरत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. सफाई कंत्राटात काही नगरसेवकांचे हितसंबंध असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.

४३ प्रभागांचा विस्तार असलेल्या महानगराची साफसफाई ही ७६२ सफाई कर्मचारी आणि दैनंदिन कंत्राट प्रक्रियेनुसार राबविली जाते. एकूणच स्वच्छतेच्या कंत्राटासाठी वर्षाला १७ कोटी रूपये खर्च केले जातात. यात महापालिकेच्या ७६२ सफाई कर्मच्यार्‍यांच्या वेतनाचा समावेश नाही. तरीदेखील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र संपूर्ण शहरात आहे. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रूपये खर्च होत असताना जागोजागी कचर्‍याचे ढिगारे आणि तुंबलेल्या नाल्या कायम असतील तर दैनंदिन साफसफाई यंत्रणेत कुठेतरी गौडबंगाल सुरु असल्याची शंका निर्माण होते. कंटेनरच्या आजूबाजूला कचरा नसलेले एकही ठिकाण शोधून सापडणार नाही, अशी कचर्‍याचे शहर म्हणून अमरावती महानगराची नवी ओळख निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून यावर शिक्कामोर्तब केले आहे, हे विशेष.

झोपडपट्टय़ांमध्ये फारच विदारक चित्र असून कचर्‍याचे ढिगारे आणि सतत तुंबून राहणार्‍या नाल्यांमुळे नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. नाल्यांची साफसफाई व्यवस्थितरीत्या होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दुर्गधींने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी काही भागांत बालकांना असाध्य रोगाने ग्रासल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हीच परिस्थिती राहिल्यास मोठय़ा प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. दैनंदिन साफसफाई कंत्राटात अनियमितता

असली तरी महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांवर प्रशासनाने कोणती जबाबदारी सोपविली हा संशोधनाचा विषय ठरत आहे. स्वच्छतेविषयी महापालिका आयुक्त अरूण डोंगरे हेदेखील नाराज असल्याचे त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केले.